एनएमसी बिलाला होमिओपॅथीक डॉक्टरांचा पाठिंबा
विवेक तोटेवार, वणी: डॉक्टरांच्या कमतरतेमुळे होमिओपॅथी डॉक्टरांना आता ब्रिज कोर्स केल्यानंतर रोगाचे निदान ऍलोओपॅथी पद्धतीने करता येणार आहे. त्याबाबत केंद्र सरकारने बिल विचारात ठेवले आहे. सदर बिलाला वणीतील होमिओपॅथी डॉक्टरांनी पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या रिपोर्टनुसार ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी म्हणून होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी, सिद्धा यांना अॅलोपॅथी प्रॅक्टिस 6 महिन्यांचा ब्रिज कोर्स केल्यानंतर देण्यात यावी याचा विचार करून तशा प्रकारचे केंद्र सरकारने एन एम सी बिल व ब्रिज कोर्सची तरतूद केली आहे. महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये हा नियम आणला आहे. परंतु आता केंद्र सरकारने सदर बिल आणून कुठेतरी आयुध डॉक्टरांना मोठा दिलासा दिला आहे.
संपूर्ण देशात शहरात जर सोडले तर ग्रामीण भागात आयुध डॉक्टरच विशेष सेवा देत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनता नक्कीच फायदा होणार आहे. वणीतही आयुध डॉक्टरांची संख्या अधिक आहे. त्यांनाही यामुळे न्याय मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील 67 हजार डॉक्टरांनी सरकारने जे पाऊल उचलले आहे त्याचे स्वागत केले आहे.
वणी येथे डॉक्टरांच्या असोसिएशनद्वारे नायब तहसिलदाराणा निवेदन देऊन सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. या अनुषंगाने एन एम सि बिलाला समर्थन देत सर्व आयुध डॉक्टरांच्या वतीने दिनांक 5 व 6 फेब्रुवारीला दिल्लीतील रामलीला मैदानात मोठी रॅली काढून आपण सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत आहे हे दाखवून देणार आहे. या दिवशी सर्व आयुध डॉक्टर आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सरकारचे समर्थन करणार आहे. तरी सर्व आयुध डॉक्टरांनी या बदल उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेद्वारा करण्यात आले आहे.
यावेळी आयुध डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर कोंडावार,उपाध्यक्ष एकनाथ डाखरे,अरुण विधाते, चंद्रकांत झाडे, चैताली भोगेकर, राजेन्द्र धांडे, नईम शेख, के.बी.चौधरी, अरुण एकरे, प्रदीप ठाकरे, डॉ. सत्तार, पद्माकर मत्ते, अविनाश खापणे, किशोर पेचे, शोभा खुराणा उपस्थित होते.