विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात प्रथम आलेल्या व एस पीएम कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वसंत जिनिंग व रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे यांच्याद्वारे सत्कार करण्यात आला. भविष्यात असेच यश संपादन करण्याकरिता त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वसंत जिनिंगच्या कार्यालयात 26 जुलै रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देविदास काळे अध्यक्ष वसंत जिनिंग व रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्था, प्रमुख अतिथी म्हणून टिकाराम कोंगरे, विवेक मांडवकर, विकास भोंगळे, रमेश भोगळे, धनराज भोंगळे, माजी नगराध्यक्ष करुणा कांबळे उपस्थित होते.
तालुक्यातून 90.46 टक्के घेऊन प्रथम येणारी सुवर्णा किसनराव हनुमंते, एस पी एम कनिष्ठ महाविद्यालयातून 88.61 टक्के विज्ञान शाखेत प्रथम येणारी मानसी रवींद्र कांबळे, द्वितीय येणारा लक्ष्मीकांत गणेश वनकर व तृतीय येणारी गौरी विकास भोंगळे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील बेलोरा या लहानशा गावातून येऊन आपले आपल्या परिवाराचे व गावचे नाव मोठे करणारे कांबळे व भोंगळे कुटुंब असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भोंगळे यांनी तर सूत्रसंचालन व आभार बंडू कांबळे यांनी मानले.