काम आणि कुटुंबाचा ताळमेळ बसविणाऱ्या नारीशक्तीचा केला सन्मान

जितेन्द्र कोठारी, वणी : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात महिलावर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. नोकरी, व्यवसाय, समाजसेवा, राजकारण करीत असताना महिलांना कुटुंबाची जबाबदारीसुद्धा चोखपणे पार पाडावी लागतात. कुटुंब आणि कामाचा समन्वय साधून काम करणाऱ्या अश्याच काही महिलांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तेरापंथ महिला मंडळातर्फे वणी येथील तेरापंथ भवनात ‘तालमेल’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्कार करण्यात आले. 

अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमात गायत्री पार्लर व क्राफ्ट पेंटिंग संचालिका गरिमा छाजेड, इंडियन गॅस एजन्सीच्या संचालिका श्वेता जैन, श्रीमान श्रीमती जनरल स्टोअर्सच्या संचालिका कविता गेलडा, अंजुला चींडालिया, डॉ. सपना वैद, माजी नगरसेविका संगीता भंडारी, संजू कोचर, ऍड. पूजा भंडारी, रामदेव बाबा मूकबधिर व मतिमंद शाळेच्या संचालिका व  प्रिंसिपल सरोज भंडारी या कृतत्ववान महिलांचे गुलाब पुष्प रोपटे देऊन सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला नेहा चींडालीया हिने मंगलाचरण पाठ केले. त्यानंतर तेरापंथ महिला मंडळच्या अध्यक्षा बीना गेलडा यांनी प्रास्ताविक केले.  यावेळी व्यासपीठावर उपस्थित तेरापंथ समाजाच्या वरिष्ठ महिला कांताबाई भंडारी, पतासीबाई चिंडालिया, शांताबाई भंडारी, हिराबाई भंडारी, सज्जनबाई चिंडालिया यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा अमरावबाई गेलडा यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांमध्ये आत्मविश्वास खूप महत्वाचा असून आत्मविश्वास असेल तर त्या पुढे जातील आणि मागे वळून पाहावे लागणार नाही. असे विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन सरोज भंडारी यांनी केले तर आभार सपना वैद्य यांनी मानले.

Comments are closed.