ICSI या प्रतिष्ठीत संस्थेच्या उपाध्यक्षपदी वणीचे मोहीत बत्रा

नागपूर चॅप्टरसाठी नियुक्ती, मोहीत हे विदर्भातील नामवंत कॉर्पोरेट लॉचे तज्ज्ञ

वणी बहुगुणी डेस्क: आईसीएसआईच्या नागपूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी सीएस भावेश थदानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर मुळचे वणीचे असलेले सीएस मोहित बत्रा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीएस सुमित खिचा यांची सचिव तर सीएस दिशा श्रॉफ यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आहे. आयसीएसआई म्हणजेच भारतीय कंपनी सचिव संस्था ही सर्व कंपनीच्या सचिवांची एक संस्था असून ही कार्यकारिणी नागपूर चॅप्टरसाठी (विभाग) आहे.

Podar School 2025

हा कार्यकाळ 19 जानेवारी 2024 ते 18 जानेवारी 2025 पर्यंत राहणार आहे. इतर व्यवस्थापकीय समिती सदस्य म्हणून सीएस खुशाल बजाज, सीएस दीप्ती जोशी, सीएस हर्षल किल्लेदार, सीएस प्रियंका श्रीनिवास यांची निवड झाली आहे. तर सीएस दीप्ती जोशी यांची इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) च्या पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या सचिवपदी निवड झाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मोहीत बत्रा यांचा थोडक्यात परिचय
मोहीत बत्रा हे मुळचे वणी येथील रहिवासी आहे. सध्या ते नागपूर येथे स्थायिक आहेत. मोहीत बत्रा यांनी पदवी कॉमर्स शाखेत केली असून त्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापिठातून एलएलबी केले आहे. त्यांना कॉर्पोरेट लॉ, टॅक्सेशन, जीएसटी, ट्रेड मार्ग इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जाते. मोहीत बत्रा ऍन्ड असोसिएट या नावाने त्यांची कंपनी असून या कंपनीद्वारा व्यावसायिक, उद्योजक इत्यादींना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाते.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) ही भारतातील एकमेव मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्था आहे. ही संस्था कंपनी सचिवांच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी स्थापन केली आहे. सध्या, ICSI मध्ये 70,000 हून अधिक सदस्य आणि सुमारे 2.5 लाख विद्यार्थी आहेत. ICSI चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे, चार क्षेत्रीय कार्यालये नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई येथे आहेत आणि भारतभर 72 चॅप्टर आहेत. सदर निवड ही नागपूर चॅप्टरसाठी आहे. यात विदर्भातील मोठ्या भागाचा समावेश आहे. ICSI च्या नागपूर चॅप्टरच्या अखत्यारीत एकूण 500+ सदस्य आणि 4000+ विद्यार्थी आहेत.

ICSI भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते. ही संस्था कंपनी सेक्रेटरीज (CS) कोर्सच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि CS सदस्यांना सर्वोत्तम दर्जाचे मानके प्रदान करते. ICSI भारत सरकारच्या अशा उपक्रमांमध्ये योगदान देत आहे, ज्यात भारताच्या सामाजिक-आर्थिक वाढीची उत्कृष्ट क्षमता आहे.

Comments are closed.