नेत्रदोष असणाऱ्यांना नवी दृष्टी, दर महिन्याला दोन मोफत ऑपरेशन

स्माईल फाउंडेशनचा डॉ. अनिकेत अलोणे यांच्या सहकार्यातून उपक्रम

वणी बहुगुणी डेस्क: स्माईल फाउंडेशनने ‘नवी दृष्टी’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत प्रत्येक महिन्याला वणीतील ख्यातनाम नेत्ररोग तज्ञ डॉ. अनिकेत अलोणे हे दोन ऑपरेशन मोफत करणार आहेत. मोतीबिंदू, तिरळेपणा किंवा ऑपरेशनयोग्य जे काही डोळ्यांचे दोष असतील ते काढले जातील. यासाठी स्माईल फाउंडेशनच्या एस.पी.एम शाळेजवळील वॉटर सप्लाय येथील कार्यालयात संपर्क साधण्याची विनंती स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी केली आहे. मोफत नोंदणीसाठी सागर जाधव 7038204209, आदर्श दाढे, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर यांच्याशी संपर्क साधावा.

Comments are closed.