झरी तालुक्यात धावत आहे तेलंगणातील “लाल घोडा”

तेलंगणातील दारूची तालुक्यात अवैधरित्या तुफान विक्री

0

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊन मध्ये सरकारने बियरबार, वाईनशॉपी व देशी दारूचे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून मद्यापींची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण आता मद्यपींच्या मदतीला तेंलंगणातील ‘लाल घोडा’ धावला आहे. सध्या या लाल घोड्याची तालुक्यात धूम सुरू असून प्रशासन नेहमीसारखे सुस्त आहे. 

     

मुकुटबन अडेगाव मांगली,पाटण झरी पुरड गणेशपूर घोंसा व इतर ठिकाणी तेलंगणातील मिळणारी “लालघोडा” नावाची दारू मोठ्या प्रमाणात मद्यपिकरिता उपलब्ध झाली आहे. तसे या दारूचे नाव वेगळे आहे मात्र ती परिसरात लाल घोडा नावाने प्रचलित झाली आहे  वरील प्रत्येक गावातील तरुण युवक दुचाकी व चारचाकीने तेलांगणातून दारू आणून विक्री करीत आहे. तर अनेकांनी दारू पुरवठा करण्याचा ठेकाच घेतला आहे. मदयपींची मागणी वाढल्याने तेलांगणातून महराष्ट्रात दररोज लाखो रुपयाची लालघोडा नावाची दारू तस्करी केल्या जात आहे. 

तेलंगणातील बेला व जैनत तसेच आदीलाबाद येथून  पैनगंगा नदीच्या मार्गाने दारू मांगली मार्गाने ,मंगरूळ घाट, कोठोडा दुर्भा घाट, परसोडा घाट, दिपाईगुडा, अनंतपुर मार्ग दिग्रस वरून पाटण, झरी, मुकुटबन, अडेगाव येथे येत आहे. पाटण येथील पेट्रोलपंप समोर, मुकुटबन येथील धाबे व गल्लोगल्लीत तसेच अडेगाव येथे खुलेआम दारू विक्री सुरू आहे.

तेलंगणातील लालघोडा नावाची दारू संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणे मिळत असल्याने मद्यपी सह तस्करी करणारे व दारू आणून विकऱ्यांच सद्या चांदीचे झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तरी अबकारी व पोलीस विभाग यांनी दुकानाच्या मागील गेट खोलून दारू व बियर विक्री करण्यावर कठोर कार्यवाही करावी तसेच तेलंगणातील येणाऱ्या दारूवर प्रतिबंध करावी अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या तालुक्यात 60 रुपयांचा देशी दारूचा पवा 200 ते 250 रुपयाने विक्री करीत आहे. मुकुटबन येथील काही बियरबार चालकांनी इंग्लिश दारू 350 ते 400 रुपये दराने विक्री करून लाखो रुपये कमवीत आहे. मुकुटबन येथील काही बियरबार चालकांनी दुकानाच्या मागील दरवाज्याने इंग्लिश दारू व बियर काढून चढ्या दराने विक्री करीत आहे. बियरबार चालक आपल्या जवळील लोकांना दारुची सेवा देत आहे. ज्यामुळे बारा चालकांनी केला तो कायदा का ? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. अबकारी विभागाच्या खादाड धोरणामुळे दुकानाच्या पुढे सील दाखवतात मागच्या गेटचे काय त्याला बंद कोण करणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

बहुतांश बार चालकाने शासकीय बंदच्या दिवशी चोरीने बियर व  दारूच्या पेट्या काढण्याकरिता दुकानाच्या आजूबाजूला किंवा मागे गेट बनविले आहे. या गेटवर सुद्धा सील किंवा तो दरवाजा बंद केल्यास अवैध दारू विक्री बंद होईल हे नक्की. देशी दारू व बियरबार ला पुढे सील तर मागून चालू अशी परिस्थिती आहे. काही बियरबार चालकांनी तर चक्क एक्सपायर झालेली बियर सुद्धा विकली आहे तर खराब देशी दारुची विक्री सुद्धा करण्यात आली ज्यामुळे अनेक मदयपींना उलट्या सुद्धा झाल्या व त्याची प्रकुर्ती खराब झाल्याची माहिती आहे

हे देखील वाचा:

आज 53 रुग्ण कोरोनामुक्त, दोन दिवसांत 100 पेक्षा अधिकांची कोरोनावर मात

… आता ‘असे’ कराल तर खबरदार!

 

Leave A Reply

Your email address will not be published.