ठाणेदारांच्या नाकावर टिच्चून तालुक्यात अवैध दारूविक्री

मुकुटबन, अडेगाव, गणेशपूर व तेजापूर येथे खुलेआम दारू विक्री

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतरर्ग येणा-या भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे अवैध दारूविक्रीवर कारवाई करण्याचे आदेश असतानाही ठाणेदारांच्या नाकावर टिच्चून ही दारू तस्करी सुरू आहे. काही भ्रष्ट कर्मचा-यांचे दारू तस्करांशी साटेलोटे असल्यानेच ही तस्करी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

मुकुटबन व पुरड येथून दारुची तस्करी चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी व चारचाकी वाहनाने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुकुटबन, कोठोडा, खातेरा घाटावरून दररोज 50 ते 100 पेटी दारू चंद्रपूर जिल्ह्यात सप्लाय सुरू आहे. मुकुटबन येथील एका धाब्यावर खुलेआम टेबल खुर्ची लावून बियरबार सारखी सुविधा देत दारुची अवैधरित्या विक्री सुरू आहे. याबाबत पोलिसांना माहीत असून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. धाब्यावर यापूर्वी एसडीपीओ पथक व मुकुटबन पोलिसांनी धाड टाकली होती. मात्र त्यानंतरही इथे राजरोसपणे  अवैध दारूविक्री कशी सुरू आहे हे न उलगडलेले कोडे आहे.

अडेगाव येथील निर्मला, कलाबाई, निलेश, बंडू, मंगेश, रवी नामक व्यक्ती मोठ्या प्रमाणात दारू विक्री करीत असल्याची माहिती आहे. तर तेजापूर येथील माणिक, गणेशपूर येथील सीनु व डोंगरगाव येथील तीन व्यक्ती खुलेआम अवैध दारूची विक्री करीत आहे. खातेरा गावातील दोन व्यक्ती पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून चंद्रपूर जिल्यातील लोकांना दारू विक्री व तस्करी मोठ्या प्रमाणात करीत आहे. खातेरा ,तेजापूर, कोठोडा व गाडेघाट पैनगंगेच्या घाटावरून लाखो रुपयांची दारू तस्करी दररोज केल्या जात आहे.

वरील गावातील दारू विक्रेत्यांना मुकुटबन व पुरड येथून दारूचा पुरवठा केल्या जात असून याकडे पोलिसांनी अर्थपूर्ण धोरणामुळे कुणावरही कार्यवाही करीत नसल्याचे पहायला मिळत आहे. पोलीस कर्मचारी हे वरिष्ठ अधिकारी यांना कार्यवाही करीत असल्याचा देखावा करीत दोन व चार शिष्या वाल्यांना पकडून केस करीत आहे तर दुचाकी व चारचाकी वाहनाने लाखो रुपयांची दारू तस्करी व विक्री करणाऱ्याकडे ढुंकूनही पाहत नाही.

गावातील अनेक अवैध धंद्याबाबत ठाणेदार हे अनभिज्ञ असून काही भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्याच्या भरवशावर हे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप होतोय. जिल्ह्यात पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक असून हे सुद्धा कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही पथकातील काही कर्मचाऱ्यांना याबाबत संपूर्ण माहिती असूनसुद्धा कोणतेही कार्यवाही करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन मुकुटबन परिसरातील सर्व अवैधरित्या दारू विक्री व चंद्रपूर जिल्ह्यात होणारी दारुची तस्करी बंद करून दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा:

गेल्या तीन दिवसात 418 रुग्णांची कोरोनावर मात

व्यावसायिकाला दुकान उघडणे पडले महागात

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!