मांडवी घाटावर रेतीचा अवैधरित्या उपसा करणारा ट्रॅक्टर जप्त

मध्यरात्री दोन कारवाई अपयशी ठरल्यानंतर तिसरी कारवाई यशस्वी

0

पाटण: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या मांडवी येथील रेतीघाटावर महसूल विभागाने धाड टाकली. यात रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. सकाळी साडे 7 वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागाने पाठलाग करून ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले. या कारवाईत 1 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. सध्या ताब्यात घेतेला ट्रॅक्टर पाटण पोलीस स्टेशनला लावण्यात आला आहे. पुढील प्रक्रिया सुरू आहे.

झरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर मांडवी व टाकळी गावानजीक खुनी नदीचा रेती घाट आहे. शनिवारी रात्री महसूल विभागाला टाकळी घाटावरून रेतीचा अवैध उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रात्री 12 वाजताच्या सुमारास महसूल व पोलीस विभागाने त्या ठिकाणी सापळा रचला. मात्र रेती तस्करांना याची आधीच माहिती मिळाली.

रात्रभर तिथे दबा धरून बसल्यानंतरही घाटावर रात्री कुणीच आले नाही. दरम्यान त्यांनी नदीचा 2 किमी पर्यंतचा सर्व परिसर पिंजून काढला. पहाटे रेतीचा अवैधरित्या उपसा करण्यासाठी काही ट्रॅक्टर आले. ट्रॅक्टर येताच पथकाने ट्रॅक्टरकडे धाव घेतली. मात्र सर्व गाडी चालक पळून गेले. महसूल विभागाने त्यांचा पाठलाग केला. मात्र तस्कर पसार होण्यात यशस्वी झाले.

अखेर तिसरी कारवाई यशस्वी
दरम्यान मांडवी घाटात रेतीचा अवैधरित्या उपसा होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. त्यावरून त्यांनी सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान मांडवी घाटावर धाड टाकली असता तिथे एक ट्रॅक्टर (MH29 V4511) आढळून आले. मात्र पथक येताच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन गावात पळून आला. महसूल विभागाने पाठलाग करून ट्रॅक्टर पकडले. याबाबत पोलिसांना माहिती दिली. गावात पोलीस पथक आले व ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले.

या प्रकरणी महसूल विभागाने एक ब्रास रेती व ट्रॅक्टर जप्त केले. सदर कारवाईच्या वेळी मंडळ अधिकारी भोयर, चांदेकर तलाठी, संग्राम गीते, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, पोलीस पाटील टाकळी दशरथ बुर्रेवार, पोलीस पाटील मांडवी, सचिन कुळसंगे, कोतवाल सतीश धुर्वे यांच्यासह महसूल व पोलीस विभाग पाटण व पांढरकवडा येथील कर्मचारी उपस्थित होते. वृत्त लिहेपर्यंत पुढील कारवाई सुरू होती.

हे देखील वाचा:

5 महिन्यातच मोडला प्रेमाचा करार, प्रेयसीला गर्भवती करून प्रियकर फरार

मुकुटबन येथे वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांचे नुकसान

Leave A Reply

Your email address will not be published.