दामले फैलातून 60 हजारांचा दारूसाठा जप्त

महेश बबन गायकवाड याला अटक

0

रवी ढुमणे, वणी: वणी शहरातील दामले फैल भागातून मंगळवारी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. यात महेश बबन गायकवाड (26) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून 60 हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Podar School 2025

दामले फैल भागात महेश गायकवाड याच्या घरी दारूसाठा असल्याची माहिती पेट्रोलिंग दरम्यान ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांना मिळाली. त्यांनी पथकातील सुदर्शन वानोळे, अरुण नाकतोडे, अनंत इरपाते, सुधीर पांडे,शेख नफिस,सुनील खंडागळे, उल्हास कुरकुटे, दिलीप जाधव, महेश नाईक यांच्यासह गायकवाड याच्या घरी धाड टाकली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

(हे पण वाचा: Exclusive: नदी पलीकडे दारू पोहचविण्यासाठी निवडली सुनसान जागा)

त्याच्या घरातून ६० हजाराचा दारूसाठा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.