सुशील ओझा, झरी: लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत अडेगाव असून आज कोविड 19 लसीकरणाच्या जिल्हा परिषद शाळा अडेगाव येथे तहसीलदार गिरीश जोशी व सरपंच सीमा लालसरे, जिल्हा परिषद सदस्य संगीता मानकर, गटविकास अधिकारी मुंडकर यांच्या हस्ते रिबीन कापून शुभारंभ करण्यात आला.
कोरोना लसीकरण 45 वर्षाच्या वरील नागरिकाना सुरू करण्यात आले आहे. जनतेनी
लसीकरणला येते वेळी सोबत आधार कार्ड घेऊन यावे. लसीकरण सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहणार आहे.
उदघाटन करतेवेळी सरपंच सीमा लालसरे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तहसिलदार गिरीश जोशी ,विस्तार अधिकारी इसलकर मुकुटबनचे ठाण्याचे ठाणेदार धर्मा सोनुने ,जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका गद्दमवार व सर्व शिक्षक उपस्तीत होते,समाजसेवक आरोग्य तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन गेडाम ,डॉ.पंडित व आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी आणि आशा सेविका ,अंगणवाडी सेविका ,व ग्रामवासी उपस्थित होते
हे देखील वाचा: