आज तालुक्यात कोरोनाचे 13 रुग्ण

अद्याप हजार पेक्षा अधिक संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी

0

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 6 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाचे 13 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 9 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील भीमनगर, जैन ले आउट, शास्त्रीनगर, प्रगती नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात कुरई येथे 2 तर शिंदोला, चिखलगाव, गणेशपूर, नांदेपेरा, लालगुडा, बेलोरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर मारेगाव तालुक्यातील 2 रुग्ण वणी येथे पाझिटिव्ह आले आहे.

आज यवतमाळ येथून एकही अहवाल प्राप्त नाही. आज 227 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 13 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 214 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 162 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 1137 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 8 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली

सध्या तालुक्यात 121 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 49 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 36 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 36 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1604 रुग्ण आढळून आलेत. यातील 1457 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

डॉ. पद्माकर मत्ते हल्ला प्रकरणी 4 आरोपींना अटक

आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण

Leave A Reply

Your email address will not be published.