आता ब्लड व इतर टेस्टचे सॅम्पल नागपूरला पाठवण्याची गरज नाही….
गुरुवारी वणीत ऑर्कीड पॅथोज व डायग्नोस्टीक लॅबचे उद्घाटन, मिळणार अचूक व वेळेत रिपोर्ट
बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथे आर्कीड पॅथोज व डायग्नोस्टिक या लॅबचे गुरुवारी दिनांक 10 जुलै रोजी उद्घाटन होणार आहे. हे सेंटर अत्याधुनिक यंत्रे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध अचूक प्रयोगशाळा चाचण्या उपलब्ध करून देणार आहे. याआधी रुग्णांना अनेक चाचण्यांसाठी नमुने नागपूरला पाठवावे लागत होते, परंतु आता ही गैरसोय दूर होणार असून रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार सेवा मिळणार आहे. डॉ. सुदेष्णा अविनाश देठे (गजभिये) (MBBS, MD Path) या सेंटरच्या संचालिका असून, त्यांच्याकडे पैथोलॉजी क्षेत्रात विशेषज्ञता आहे. हे सेंटर वणी येथील बस स्थानकासमोरील माधव मेडिकलच्या बाजूला सुरू होत असून, अचून निदानासाठी रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेंटरतर्फे करण्यात आले आहे.
काय आहेत ऑर्कीड पॅथोजचे वैशिष्ट्ये ?
आर्कीड पॅथोज हे सेंटर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मशिन्सनी सुसज्ज आहे, ज्यामुळे रोगांचे अचूक निदान शक्य होणार आहे. वणीत काही चाचण्यांसाठी नमुने नागपूरला पाठवावे लागत असल्याने ट्रान्सपोर्टमुळे अहवालात फरक पडण्याची शक्यता होती. मात्र, आता या चाचण्या वणीतच होणार असल्याने रुग्णांना सटीक आणि वेळेवर अहवाल मिळतील. विशेषतः रक्त तपासणीसाठी असलेल्या अत्याधुनिक मशिन्समुळे विविध रोगांमध्ये फायदा होईल. उदाहरणार्थ, मलेरियाचे चार ते पाच प्रकार असतात; या टेस्टमुळे रुग्णाला नेमका कोणता प्रकार आहे, हे ओळखता येईल. त्यामुळे डॉक्टरांना अचूक उपचाराची दिशा मिळेल.
डॉ. सुदेष्णा यांचा परिचय…
डॉ. सुदेश्ना देठे गजभिये या वणी शहरातील पहिल्या एमडी पॅथॉलॉजी विशेषज्ञ आहेत. त्यांनी पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेज (ससून हॉस्पिटल) मधून एमबीबीएस आणि एमडी पॅथॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील राजावाडी हॉस्पिटल आणि मनपा हॉस्पिटलमध्ये सेवा दिली. तसेच बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. त्यांचा हा अनुभव वणी व परिसरातील रुग्णांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
पॅथॉलॉजी लॅब व डायग्नोस्टीक सेंटर
पॅथॉलॉजी लॅब आणि डायग्नोस्टिक सेंटर हे आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावतात. पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त, मूत्र, आणि इतर शारीरिक द्रवांचे विश्लेषण केले जाते, तर डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तपासण्या करून रोगांचे निदान केले जाते. या चाचण्यांमुळे डॉक्टरांना रुग्णांवर सटीक उपचार करण्यास मदत होते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रुग्णांचे आरोग्य सुधारते.
Comments are closed.