वणी: वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर कॉलरी येथे ग्रामपंचायतभवना नंतर आता जलशुद्धीकरण यंत्राचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. स्वतंत्रदिनाचं औचित्य साधून या यंत्राचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
17 सदस्यीय संख्याबळ असलेल्या राजूर कॉलरी येथे विविध विकास कामांना चालना देत सरपंच प्रणिता मो असलम यांनी सदस्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत भवन साकारले. या भवनाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सरपंच प्रणिता मो असलम यांनी शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे हेतूने जलशुद्धीकरण यंत्र बसविले.
या जलशुद्धीकरण यंत्राचे उदघाटन सरपंच प्रणिता मो असलम यांचे हस्ते पार पडणार असून ग्रामपंचायत उपसरपंच बिना अजित सिंग, सचिव महेंद्र चहानकार सदस्य नितीन मिलमिले, विद्या पेरकावार, उर्मिला भगत,प्रवीण खानझोडे,अरुणा खोब्रागडे,वंदना देवतळे, मो शकील, धनराज देवतळे, सावन पाटील, सुवर्णा काकडे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.