विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंबंधी प्रश्नासाठी उपोषण

40 विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेत प्रवेशाचा प्रश्न प्रलंबित

0

वणी: वणी आणि परिसरातील अनेक विद्यार्थी 11 वी विज्ञान शाळेत प्रवेशापासून वंचित आहे. या प्रश्नासंबंधी वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे अखेर स्वप्निल धुर्वे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार पासून ते उपोषणाला बसले आहे. सध्या उपोषणकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केलं असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न न सोडवल्यास आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.

वणी विभागातील सुमारे 40 विद्यार्थी हे विज्ञान शाखेत प्रवेशापासून वंचित आहे. हे विद्यार्थी हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना विनाअनुदानित तुकडीत विनामुल्य प्रवेश द्यावा अशी मागणी करण्याता आली होती. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

एसपीएम आणि लोकमान्य टिकळ महाविद्यालयात अनुदानित तुकडी आहे. या अनुदानित तुकडीची प्रवेश क्षमता वाढवता येऊ शकते. त्यामुळे अनुदानिक तुकडीची क्षमता वाढवून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वप्निल धुर्वे हे गेल्या वर्षीही विद्यार्थ्यांचा हा प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते. तेव्हा 40 जादा प्रवेश अनुदानित तुकड्यात देण्यात आले होते अशी माहिती त्यांनी दिलीये.

Leave A Reply

Your email address will not be published.