स्वातंत्र्यदिनी सरपटवार परिवाराची झेंडावंदनाची हॅट्रिक

परिवारातील तिघांनी केले वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दुधात साखर पडावी असा मधुरयोग सरपटवार परिवारासोबत शनिवारी स्वातंत्र्यदिनाला आला. या परिवारातील माधवराव, भारती आणि शैलेश सरपटवार यांच्या हस्ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदन झाले. त्यामुळे झेंडावंदनाची सरपटवार परिवाराची ही हॅट्रिक झाली.

नगरवाचनालयाचे अध्यक्ष या नात्याने माधवराव उपाख्य बाळासाहेब सरपटवार यांनी ध्वजारोहण केले. वनिता समाजाच्या अध्यक्षम्हणून भारती मा. सरपटवार यांनी स्थानिक वनिता समाज येथे ध्वजारोहण केले. तर यांचे चिरजीव शैलेश सरपटवार यांनी माणिकगड सिमेंटच्या लाईमस्टोन प्रकल्पाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. शैलेश हे माणिकगड सिमेंट, लाईमस्टोन माईनचे डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत.

वणीतील शासकीय मैदानावर गणराज्यदिन साजरा होतो. या गणराज्यदिनाच्या संपूर्ण कार्यक्रमांचं संचालन माधवराव सरपटवार यांनी जवळपास गेल्या दोन दशकांपासून केलेलं आहे. विविध सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांसोबत ते जुळलेेले आहेत. भारती सरपटवार ह्या वनिता समाजाच्या अध्यक्ष आहेत. या आणि अन्य संस्थांच्या माध्यमांतून विविध उपक्रम त्या वर्षभर घेत असतात.

अभियंता असलेले शैलेश सरपटवार हे कला आणि साहित्य रसिक आहेत. ते आणि त्यांच्या पत्नी शर्वरी यादेखील कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी या परिवाराला नाही. तरीदेखील साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची ही पावतीच आहे. सर्वत्र या परिवाराचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.