झरी तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा
सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात
सुशील ओझा,झरी: संपूर्ण देशात स्वतंत्र दिवस म्हणून १५ ऑगस्ट या दिवशी मोठ्या जल्लोष व उत्साहात साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने झरी तालुक्यातही मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वतंत्र दिवस झेंडा फडकवून, सलामी देऊन वंदन करण्यात आले. झरी पंचायत समितीमध्ये सभापती लता आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, विस्तार अधीकारी इसलकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. पाटण पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
तिरंग्याला सलामी देण्यात आली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते. झेंडावंदन करून ठाणेदार बारापात्रे तेथीलच शाळेत जाऊन उपस्थित झाले. विद्यार्थ्यांना खाऊवाटप केले. मुकूटबन ग्रामपंचायत मध्ये सरपंच शंकर लाकडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच अरुण आगुलवर सचिव कैलास जाधवसह ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित गणमान्य उपस्थित होते.
मुकूटबन पोलिस स्टेशन मध्ये ठाणेदार धर्मराज सोनुने यांनी ध्वजारोहण करण्यात आले व तिरंग्याला सलामी देण्यात आले.त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक वनदेव कापडे, पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते. पुनकाबाई आश्रम शाळा येथे संस्थेचे मानद सचिव गणेश उदकवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये उपसभापती संदीप विचू यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी सचिव रमेश येल्टीवार व समितीचे सदस्य व कर्मचारी होते.
तर गजानन महाराज महाविद्यालयात प्रा संजय घरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. मुकूटबन येथील सर्वच जिल्हा परिषद विद्यालयात ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणन्यात आले. त्यानंतर मुख्य मार्गाने गावातून प्रभात फेरी काढून भारत माता की जय,वंदे मातरम व इतर जयघोष करीत ही फेरी काढल्या. विशेष म्हणजे शालेय विदयार्थी ,व ग्रामवासीयांनी कोल्हापूर व सांगली या पूरग्रस्त लोकांना मदती करिता सुद्धा रैली मध्ये मदतीचे आवाहन करून मदत निधी गोळा करण्यात आली.