अपक्षांना मिळाले बोधचिन्ह, कोणत्या उमेदवारांचे कोणते बोधचिन्ह?

4 मान्यताप्राप्त, 2 नोंदणीकृत पक्ष तर 6 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

निकेश जिलठे, वणी: आज दु. 3 नंतर अपक्ष उमेदवारांना बोध चिन्ह देण्यात आले. अरुणकुमार खैरे पक्ष बहुजन समाज पार्टी यांना हत्ती, राजू मधूकरराव उंबरकर पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना रेल्वे इंजिन, संजय निळकंठराव देरकर पक्ष शिवसेना (उबाठा) यांना मशाल, संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार पक्ष भारतीय जनता पक्ष यांना कमळ, अनिल घनश्याम हेपट पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांना कनिस आणि विळा, राजेंद्र कवडूजी निमसटकर पक्ष गॅस सिलिंडर हे बोधचिन्ह मिळाले आहे.

अपक्षांना मिळाले बोधचिन्ह
केतन नथ्थूजी पारखी यांना बॅट, संजय रामचंद्र खाडे यांना शिट्टी, नारायण शाहू गोडे यांना ट्रम्पेट, निखिल धर्मा ढुरके यांना माईक, हरीष दिगांबर पाते यांना कपाट तर राहुल नारायण आत्राम यांना जेवणाचे ताट हे बोधचिन्ह मिळाले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात एकूण 12 उमेदवार रिंगणात राहणार आहे. यात राष्ट्रीय व राज्यपातळीवरील मान्यताप्राप्त पक्षाचे 4 उमेदवार तर सीपीआय व वंचित असे दोन नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय सहा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात दिसणार आहे.

उद्यापासून रंगणार प्रचार
मंगळवारी दिनांक 5 नोव्हेंबर पासून अधिकृतरित्या सर्व पक्षाचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे. तत्पुर्वी आज 4 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अजय धोबे यांनी 11.26 मिनिटांनी, यशवंत शिवराम बोंडे यांनी 11.47 मिनिटांनी, आसीम हुसैन मंजूर हुसैन यांनी दु. 1.25 मिनिटांती तर प्रवीण रामाजी आत्राम यांनी मुदत संपण्याच्या अवघ्या 10 मिनिट आधी म्हणजे 2.50 मिनिटांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. उद्यापासून प्रचाराचे नारळ फुटणार असल्याने संपूर्ण शहरात काही दिवस निवडणूक ज्वर दिसणार आहे.

संजय खाडेंची लढण्याची घोषणा… पत्रकार परिषदेत खाडे यांना अश्रू अनावर

Comments are closed.