आज संध्याकाळी वणीत रंगणार इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम

पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात कीर्तनाचे आयोजन

वणी बहुगुणी डेस्क: आज बुधवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी शासकीय मैदानावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. गुरुदेव अर्बन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी व रेणुका ईरीगेशन वणी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या इंदोरिकर महाराज यांचे जगाभरात लाखों चाहते आहे. या जाहीर कीर्तनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन प्रा. टीकाराम कोंगरे यांनी केले आहे.

Comments are closed.