वणीत इनरव्हील महिला उत्सवाचे आयोजन

जैताई मंदिरात उत्सवाचं आयोजन

0

वणी (रवि ढुमणे): महिलांचे सशक्तीकरण व बालकांचा विकास होण्याच्या दृष्टीने इनरव्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी यांच्या विद्यमाने इनरव्हील महिला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 डिसेंबर ला सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यत जैताई मंदिरात करण्यात या उत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवात वणी चंद्रपूर,नागपूर,हिंगणघाट येथील व्यावसायिक विविध प्रकारच्या ज्वेलरी, कपडे,बॅग, गिफ्ट वस्तू,पुस्तके,फरसाण, खेळणी, कॉस्मेटिक, आदी वस्तूंची प्रदर्शनी व विक्री व मनोरंजक खेळ, स्पर्धा, यावर आकर्षक भेट सुद्धा असणार आहे. महिलांसाठी हेअर स्टाईल ,मेहंदी,न्यू इअर ग्रीटिंग कार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नर्सरी ते 6 वि इयत्ता पर्यत च्या बालकांसाठी चित्रकला स्पर्धा यात ख्रिसमस उत्सव हा विषय असणार आहे. या उत्सवात नागपूर येथील कलाकार, संचलन करणार आहे. सदर स्पर्धा रंगोली फॅशन वणी व शुशगंगा पब्लिक स्कुल यांच्या सहकार्याने पार पडणार आहे.

प्रोजेक्ट डायरेक्टर कमलेश लाल ,अंजुला चिंडालिया, प्रोजेक्ट समितीत शीतल अगम, स्वाती पटेल, पूजा गढवाल, मयुरी जयस्वाल, संगीता खटोड आणि इनरव्हीलचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे. या उत्सवाचा जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन इनरव्हील महिला उत्सव समितीने केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.