जब्बार चीनी, वणी: मुंबई, पुणे व नागपूर यासह बाहेर जिल्ह्यातून ई-पास घेऊन शहरात अनेक नागरीक येत आहेत. मंगळवारी नागपूरहून शहरात चार नागरीक आले. परासोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. मात्र, त्यातील दोन नागरीकांना या शिक्क्याचे इन्फेक्शन होऊन हातावर इंफेक्शन होउन डाग झाला आहे. याआधी दोन व्यक्तींना क्वारंटाईनचा शिक्का मारल्याने शिक्क्यासाठी नेमकी कोणते केमिकल वापरले जाते, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे. विषेश म्हणजे शहरातील चार ते पाच जणांबाबत असे प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या केस बाबत ‘वणी बहुगुणी’नेच हा प्रकार समोर आणला होता त्यानंतर आणखी काही केसेस समोर आल्या असून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गावातून शहरांकडे जाणा-या तसेच गावाकडे येणा-यांची गावाच्या सीमेवर नोंदणी आणि तपासणी केली जात आहे. त्यांनी आपल्या घरातच राहावे यासाठी त्यांच्या हातावर होम क्वाँरंटाइनचे शिक्केही मारले जात आहेत. मोठ्या संख्येने लोक येत असल्याने एकाच शिक्क्याच्या माध्यमातून सर्वांच्या हातावर ठप्पा मारला जात आहे. परसोडाच्या कोविड केअर सेंटरवर 9 जुनला नागपुरहून आलेल्या एका परिवाराच्या चार जणांच्या हातावर शिक्का मारला गेला.
दुस-या दिवशी यातील दोन जणांना इंफेक्शन झाले व हात सुजला आणि त्यावर फोडही आलेत. हे शिक्के मारताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे जिल्हयात हा प्रकार फक्त वणीतच आढळून येत आहे
9 तारखेलाच कारंजा (घाडगे) इथून आलेल्या एका तरुणाच्या हातावर देखील जखम झाल्याचे समोर आले होते. याबाबत वणी बहुगुणीने बातमी करत ही घटना समोर आणली होती. एक घटना समोर येताच आणखी दुसरी एक अशीच घटना समोर आली. त्यानंतर एकाच घरातील चार पैकी दोन लोकांना इन्फेक्शन झाल्याचे समोर आले आहे.
शाईमुळे नाही, तर ऍलर्जीमुळे इन्फेक्शन – डॉ. कमलाकर पोहे
बाहेरून आलेल्या दोन नागरीकांच्या हातावर होमक्वारंटाईनचा शिक्का मारल्यानंतर त्यांच्या त्वचेवर फोड आल्याचे निदर्शनास आले आहेत. परंतु या शाईमध्ये कोणताही दोष नसून आम्ही वापरत असलेली शाई ही निवडणुकीच्यावेळी वापरली जाणारीच शाई आहे. सध्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत हीच शाई वापरण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही तक्रार नाही. परंतु जर एखाद्या व्यक्तीच्या त्वचेला या शाईची ऍलर्जी असेल तर असा प्रकार घडू शकतो.
– डॉ. कमलाकर पोहे, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय वणी
विशेष म्हणजे यात जवळपास सर्व घटना या 9 तारखेच्या असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्या हातावर शिक्यामुळे इऩ्फेक्शन झाले आहे. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात याबाबत तपासणी करावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. मात्र रोज अशा संख्या समोर येत असल्याने शिक्के मारणा-यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.