मांडवी येथील गोरक्षण मधीले जनावरे विक्री केल्याची माहिती निराधार
रविवारी नागरिकांनी विक्रीच्या संशयावरून पकडले होते जनावरे
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांडवी येथे गेल्या 11 वर्षांपासून चैतन्य नावाचे गोरक्षण आहे. या गोशाळेतील जनावरे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार शेती कामाकरिता दिल्या जातात. याच उद्देशाने 30 मे रोजी मांडवी येथिल गोशाळेतून 4 बैल शेतकऱ्यांकरिता घेऊन जात असताना बैल विक्री केल्याचा संशय घेऊन वाटेतच गावातील काही लोकांनी पकडले व पाटणच्या ठाणेदारांना फोन करून घटनास्थळी बोलविण्यात आले.
ठाणेदार संगीता हेलोंडे ह्या घटनास्थळी पोहचल्या त्यावेळी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. लोकांना शांत करून जनावर असलेली चारचाकी ठाण्यात घेऊन लावली. गोशाळेचे अध्यक्ष यांना बोलविण्यात आले. गोशाळेचे अध्यक्ष अनिल चिंतकुंटलावार यांना पकडलेल्या चारही व जनावर बाबत विचारपूस केली. गोशाळेचे अध्यक्ष यांनी सदर जनावर शेतकऱ्यांना दिले असल्याचे सांगितले व ज्या शेतकऱ्यांना दिले त्यांचे ऐग्रीमेंट केलेले स्टॅम्प व इतर कागदपत्रे दाखविले.
यावरून गोशाळेतील जनावरे शेतकऱ्यांना दिले असल्याचे सिद्ध झाले व जनावरे सोडून देण्यात आले. त्यामूळे गोशाळेतील जनावरे विक्री करीत असल्याची माहिती व आरोप निराधार असल्याचे निष्पन्न झाले. मांडवी चाटवन शिवारातील गोशाळा जनावरांकरिता सर्व सुविधायुक्त असल्याचे सर्वश्रुत आहे. जनावरांची देखरेख चांगल्या पद्धतीने केली जाते. जनावरांना चारा पाणी व राहण्याची चांगली सुविधा अध्यक्ष व समितीने केल्याने सर्वाधिक जनावरे याच गोशाळेत ठेवले जाते.
बदनामी करण्याचा कट: अध्यक्ष
गेल्या 11 वर्षाच्या कालावधीत जनावर विक्री किंवा तस्करीचे काम केल्याची एकही घटना घडली नाही . गौशाळेतील जनावरे विक्री करीत असल्याचा खोटा आरोप करून मला व समितीच्या बदनाम करण्याचे काम काही जळणारे लोक हेतुपुरस्सर करीत आहे. मी व माझी गौशाळेचे समिती कधीच असे काम केले नाही व करणार नाही.- अनिल चिंतकुंटलावार अध्यक्ष चैतन्य गौशाळा समिती मांडवी
हे देखील वाचा: