सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांनाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याकरिता व पिकांचे नुकसान प्रत्यक्ष पाहण्याकरिता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबिन पिकांची पाहणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली.
शेतकऱ्यांचे सोयाबिनचे वेरायटी संकल्प व महागुजरात गोल्ड बियाणे उगवले नसल्याने समोर आले होते. पाहणी केली असता १००% उगवण शक्ती झाली नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे संबधीत कंपनीचे एम्पलॉयर मुन उपविभागीय कृषी अधिकारी यांना दोन ते तीन दिवसात पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. संबधीत कंपनीचे मॅनेजर यांच्या सोबत आमदार महोदयांनी फोनवर सवांद साधुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असता त्यांनी त्याबाबत आश्वासन दिले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहणी करीता आमदार यांच्यासोबत पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार, झरी भाजपा तालुकाध्यक्ष सतीश नाकले, अशोकरेड्डी बोदकुरवार, कृषी आत्मा समिती अध्यक्ष संजय दातारकर, तालुका कृषी अधिकारी बदकल , पंचायत समितीचे कृषी अधिकारी जगदीश बेंडे, इतर कर्मचारी वर्ग व शेतकरी वर्ग उपस्थित होते .