मास्क न घालणा-यांवर झरी तालुक्यात दंडात्मक कारवाई

मुकूटबन, पाटण, झरी, माथार्जून व शिबल्यात चालली मोहीम

0

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यात शहरी भागासह आता ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा यवतमाळ, दारव्हा, नेरमध्ये वाढत असताना आता वणीतही दोन रुग्ण आढळल्याने वणी विभागात भीतीचे वातावरण पसरले आहे. करोना विषाणु शहरातून ग्रामीण भागाकडे वाटचाल करीत असतांना सुद्धा  ग्रामीण भागातील नागरिकाना करोनाचे कुठलेही गांभीर्य दीसत नाही, मास्क न लावता सार्वजनिक ठिकानी वावरणे, सोशल डिस्टन्सिंग न राखने सार्वजनिक ठिकाणावर थुंकणे असे प्रकार ग्रामीण भागात सुरु आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष दिले आहे.

याच अनुषंगाने तालुक्यात जे लोक करोना उपाययोजनाचे उल्लंघन करीत आहे त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याचा बडगा २० जून पासून उगारला व  तालुक्यात सकाळी ९ वाजता पासून ही मोहीम हाती घेवून पाटण येथे २५ माथार्जुन १० शिबला ११ मुकटबन ह्या ठिकानी मास्क न बांधता फिरणारे ८२ लोकांवर प्रती व्यक्ती २०० रुपये प्रमाणे दंड आकारला तर मुकुटबन ३६ जनावर २०० प्रमाणे दंड तर चार दुकांदारावर २ हजार प्रमाणे सामाजिक अंतराचे उल्लंघन केल्यावरुन वसूल करण्यात आले. असे एकूण दंडाची आकारण २४ हजार ४०० रुपयाचा महसूल प्राप्त झाला या धडक मोहिमेमूळे आज करोनाची जाणिव काही लोकाना झाली आहे,

धडक मोहिमेत तहसीलदार गिरीश जोशी, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ. मोहन गेडाम, पाटण पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल बारापात्रे, मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनूने पोलिस पाटील दीपक बरशेट्टीवार, भूमारेड्डी बाजनलावार, तलाठी, ग्रामसचिव व दक्षता समितिचे पदाधिकारी पोलीस कर्मचारी सहभागी होते. सदर मोहिमेमुळे जनतेत कोरोना बाबतच्या नियमांचे उलनघन केल्यास कार्यवाही होते याची जाणीव जनतेस दुकानदारांनाही झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.