बाहेरुन येणा-या व्यक्तींना संस्थात्मक कॉरन्टाईन करा

मनिष सुरावार यांची मागणी, सोशल मीडियात पोस्ट व्हायरल...

0

जब्बार चीनी, वणी: सध्या वणीत कोरोनाच्या वाढत्या संख्ये वणीकरांची डोकेदुखी वाढली आहे. त्यावर कसा तोडगा काढता येईल यावर सध्या खलबते सुरू आहे. त्यातच वणीतील भाजपचे मनिष सुरावार यांनी प्रशासनाला केलेले आवाहन व्हायरल होत आहे. यात त्यांनी वणीच्या बाहेरून येणा-या लोकांना होम कॉरन्टाईन ऐवजी कोविड केअर सेन्टर परसोडा येथे संस्थात्मक कॉरन्टाईन करावे तसेच ज्या व्यक्तींना संस्थात्मक कॉरन्टाईन व्हायचे नसले अशांसाठी पेड कॉरन्टाईनची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

काय आहे त्या पोस्टमध्ये. मनिष सुरावार यांची व्हारयल झालेली पोस्ट जशीच्या तशी….

वणीमध्ये कोरोनाच्या एका साखळी नंतर आता दुसरी साखळीही तयार झाली आहे. केवळ वणीतच नाही तर इतर ठिकाणीही कोरोनाचा शिरकाव हा बाहेरुन आलेल्या व्यक्तींमुळे झालेला आहे. यावर उपाय म्हणून बाहेर येणा-या व्यक्तींनी एक तर होम कॉरन्टाईन किंवा संस्थात्मक कॉरन्टाईन करण्यात यावे असा नियम आहे. मात्र वणीमध्ये जी कुणी व्यक्ती येते त्या सर्वांनाच होम कॉरन्टाईनचा शिक्का मारून त्यांना घरी पाठवले जाते.

होम कॉरन्टाईनमध्ये अनेक त्रुटी आहेत. अऩेकांच्या घरी सेपरेट खोली नसते. सेपरेट खोली असली तरी सेपरेट वॉशरूम नसते. शिवाय घरात अऩेक व्यक्ती असतात, त्यांचा संपर्क होतोच. जर बाहेरून येणारी व्यक्ती पॉजिटिव्ह असेल तर संपूर्ण घरात कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय अनेक लोक भेटीगाठीसाठीही येतात, काही लोक तर यातून पळवाट काढून बाहेरही निघतात. याआधी वणीमध्ये होम कॉरन्टाईन केल्यानंतरही कोरोनाचा शिरकाव झाला व त्याचा प्रसारही झाला. आता जी नवीन साखळी तयार झाली आहे. ती देखील होम कॉरन्टाईनमुळेच झाली आहे. जर या व्यक्तींना वेळीच होम कॉरन्टाईन ऐवजी संस्थात्मक कॉरन्टाईन केले असते, तर कदाचित आज वणीत कोरोनाचा शिरकाव झालाच नसता.

जर शहराला कोरोनापासून वाचवायचे असेल तर त्यावर फक्त आणि फक्त संस्थात्मक कॉरन्टाईन करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. जर कुणाची संस्थात्मक कॉरन्टाईन होण्याची इच्छा नसले तर अशा व्यक्तींसाठी हॉटेल सारख्या ठिकाणी कॉरन्टाईन राहण्याची सवलतही देता येऊ शकते.

सध्या कोरोनामुळे हॉटेल आणि लॉज रिकामे आहेत. अनेक शहरात कॉरन्टाईन होण्यासाठी रिकामे असलेल्या खासगी हॉटेलची मदत घेतली गेली आहे. वणीतही अत्याधुनिक व सर्व सोयीसुविधा असलेले हॉटेल उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी अशी सुविधा दिली जात असल्याने यात कायदेशीररित्याही काही अडचण नसावी असे वाटते.

सध्या कोरोनाचा प्रसार होऊ नये याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून सुज्ञ नागरिकांची देखील आहे. वणीतील सुज्ञ नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात शक्य तेवढी मदत केलीच आहे. त्यामुळे प्रशासनाला कोरोनाबाबत जी काही मदत लागेल ती करण्यास माझ्यासह गृपमधले अनेक जणही तयार आहेत. मग ती मदत कोविड केअर सेन्टरसाठी असेल किंवा इतर कुठल्या कार्यासाठी.

वणीत कोरोना वाढू नये यासाठी आपण बाहेरून येणा-या लोकांना होम कॉरन्टाईन करण्याऐवजी संस्थात्मक कॉरन्टाईन करण्याचा निर्णय घ्यावा अशी मी प्रशासनास कळकळीची विनंती करीत आहे. काही निर्णय कठोर होऊन घेतले तरच शहरात कोरोनाचा प्रसार होणार नाही. तरी प्रशासन या मागणीवर नक्कीच विचार करेल ही अपेक्षा आहे.
धन्यवाद….

आपला
मनिष सुरावार

(हे पण वाचा: वणीत कोरोनाचा आकडा 14, तेली फैलातील काही भाग सील)

वणीत कोरोनाचा आकडा 14, आज 13 हाय रिस्क व्यक्ती कॉरन्टाईन

Leave A Reply

Your email address will not be published.