ओढ्याला आलेल्या पुरात चौघे गेले वाहून, एकीचा मृत्यू

एक फांदीला अडकल्याने वाचली तर दोघे बेपत्ता

0

सुनिल पाटील, वणी: शेती काम आटोपून घरी परतणारे चौघे शेतकरी-शेतमजूर ओढ्याला आलेल्या पुरात बैलबंडी सह वाहून गेल्याची खबळजनक घटना दि 9 जुलैला साय 6 वाजताच्या सुमारास शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या डोर्ली येथे घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला झाडाच्या फांदीत अडकल्याने सुखरुप बचावली आहे. तर आणखी दोन व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोर्ली गावात राहणारे काही शेतकरी व शेतमजूर काम संपवून गावात परतत होते. मीना कुडमेथे (36) मनीषा सिडाम, हरिदास खाडे (48), विनायक उपरे (47) हे चौघे जण दोन बैलबंडीत होते. आज परिसरात मुसळधार पाऊस आला. त्यामुळे गावालगत वाहणा-या ओढ्याला पूर आला होता. त्याच्यासोबत असलेल्या दोन-तीन बैलबंडी या काही वेळा आधीच ओढा पार करून सुखरूप गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ही ओढा पार करून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र ओढा पार करत असताना पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ते बैलबंडीसह पुरात अडकले.

पुराचा अंदाच न आल्याने त्यांच्या बैलबंडी मध्येच अडकल्या. पाण्याच्या प्रवाहाने त्या दोन्ही बैलबंडी उलटल्या. दरम्याने एका बैलबंडीतील एक बैल उसळून बाहेर निघाला. त्या चौघांनीही स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. पाण्याच्या लोंढ्यात बैलबंडी सह हे चौघेही वाहून गेले. त्यासोबत तीन बैलही वाहन गेले.

काही वेळाने ते लोक वाहून गेल्याची माहिती गावक-यांना कळली असता त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न घेतला. यातील मीना कुडमेथे हिचा संध्याकाळी मृतदेह आढळून आला. तर यातील मंजुषा सिडाम ही झाडाच्या फांदीत अडकल्याने वाचली. तर उर्वरित दोघेही जण अद्याप बेपत्ता आहे. तसेच बैलबंडीसह असलेल्या तीन बैलांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती समजताच तहसिलदार शाम धनमने, गटविकास अधिकारी राजेश गायनार, ठाणेदार अनिल राऊत यांनी घटनास्थळ गाठले. बेपत्ता असलेल्या हरिदास खाडे व विनायक उपरे यांचा शोध प्रशासन घेत आहे. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.

(ही बातमी नवीन माहिती आल्यावर अपडेट केली जाईल)

(हे पण वाचा: वणीच आज आढळले  आणखी दोन कोरोनाचे रुग्ण)

वणीत आणखी 2 कोरोनाचे रुग्ण, रुग्णांची संख्या 12

Leave A Reply

Your email address will not be published.