आर्यन हेरिटेज विरोधात ग्राहकांनी दिला उपोषणाचा इशारा

वणीतील चर्चित योगेश पंजाबी केस

0
विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील वणीलगतच्या गणेशपूर  येथे असलेल्या छोरिया ले-आऊटमध्ये  ग्राहकांनी सदनिका घेण्याबाबत झाली. अशी तक्रार याधीच करण्यात आली आहे. या प्रकरणी ग्राहकांचे पैसे बुडल्यात जमा आहे. त्यांचे पैसे मिळण्याचे किंवा सदनिका मिळण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने अखेर ग्राहकांनी आर्यन हेरिटेज चे मालक योगेश प्रभाकर पंजाबी यांच्याविरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात ग्राहकांनी उपविभागीय अधिकारी अपार यांना निवेदन दिले. त्याचप्रमाणे वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , पोलीस अधीक्षक यवतमाळ, पोलीस अधीक्षक नागपूर, जिल्हाधिकारी यवतमाळ,जिल्हाधिकारी नागपूर, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनाही निवेदन पाठविण्यात आले.
सदर निवेदनातुन सदनिकेची पैसे 80 ते 90 %घेऊन सदनिकेची काम पूर्ण करण्यात आले नाही व सदर काम दोन वर्षापासून बंद असल्याने ग्राहकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामध्ये काही सदनिकेची त्यांनी परस्पर दुसऱ्यांना विक्री करून फसवणूक केली आहे, असा आरोप संजय दहेकर, हरलाल चौधरी , फाल्गुन बगमारे , शत्रपती डोंगे, संदीप मुजगेवार , रतन गिरी , अमित अगरवाल यांनी निवेदनातून  केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.