Birthday ad 1

पाणी टंचाई आढावा बैठक, जि.प. उपाध्यक्षांचा बॉयकॉट

बैठकीत झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ वणी बहुगुणीजवळ...

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पं.स.अंतर्गत येनाऱ्या ५६ ग्राम पंचायती मधील गावांमध्ये पाणीटंचाई आहे. यासोबतच इतर समस्याचा आढावा जि.प.अध्यक्ष मा. माधुरीताई आडे यांच्या अध्यक्षेते खाली शुक्रवारला घेण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तालुक्यातील पाणीटंचाईची आढावा बैठक संपन्न झाली. मात्र या बैठकित सरपंचाला बोलावले नसल्याचा आक्षेप जि.प. उपाध्यक्षांनी घेत बैठकितून बॉयकॉट केला त्यामुळे बैठकित गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

बैठकी दरम्यान उपस्थित असलेल्या  जि.प.अध्यक्ष माधुरी आडे, महिला व बाल कल्यान सभापती, अरुणा खंडाळकर, पं.स.सभापती, शितल पोटे, जि.प.सदस्य अनिल देरकर,उपासभापती संजय आवारी,जि.प.शिक्षण सभापती नंदिनी दरने ,जि.प. डेप्युटी सि ओ जाधव व पं.स.बिडिओ सुनिल तलवारे यांनी यांनी ग्रामसचिवा कडून पाणीटंचाई व ईतर ग्राम पातळी वरील समस्या  जाणून घेऊन संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला.

या बैठकीला जि.प.उपाध्यक्ष श्यामभाऊ जयस्वाल यांनी बैठकीला सरपंचाना न बोलावल्याने आक्षेप घेत सभात्याग केल्याने एकच खळबळ उडाली. त्यांचे म्हणजे असे होते की ग्रामसेवक आढावा बैठकीत अापली सुरक्षित बाजू मांडून वेळ मारून नेण्याचं काम करेल, पन जर गावाचा सरपंच बैठकीला असला तर खरी समस्या  जिल्हा प्रशासनाला माहिती पडेल, आणि गावच्या समस्यांची  जाण होईल. परंतु जि.प. व पं.स. स्तरावरुन फक्त सरपंचाना डावुलन  ग्रामसेवकांना बोलावल्याने गावाच्या समस्याच निराकारण करण्यास अडचन होते. त्यामुळे हि आढावा बैठक सोडली असे जि.प.उपाध्यक्षानी ‘वणी बहुगुणी’ जवळ प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावर्षी तालुक्यात पाऊस कमी झाल्याने भुजल पातळी खाली गेली, त्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने तालुक्यात कुठल्याही गावात पाणीटंचाई झाल्यास त्याला ग्राम सचिव जबाबदार राहणार असल्याची तंबी दिल्याने प्रत्येक ग्रामस्तरावर ग्राम सचिवाची जबाबदारी वाढली. गेले अनेक वर्ष अशा आढावा बैठकी झाल्या तरी गावकऱ्यांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या आढावा बैठकीत प्रत्येक ग्रामसेवक दखल घेतील कि कागदोपत्री पाणीटंचाईचे निवारण होईल, याकडे तालुक्यातील ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे.

(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400 )

खाली क्लिक करून बघा काय झाला गोंधळ….

Leave A Reply

Your email address will not be published.