सुशील ओझा, झरी: तालुक्यात अनेक शाळा महाविद्यालय, संस्था, शासकीय कार्यालय आहेत. परंतु यातील अनेक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी शासकीय दौरा, मिटींगच्या नावाने बोगस दौरे दाखवून आपल्या घरी किंवा खाजगी कामाकरिता फिरत असतात. हे प्रहारचे तालुका अध्यक्ष आसिफ कुरेशी यांच्यामुळे उघड झाले आहे. त्यांनी जेव्हा कॉलेजला भेट दिली तेव्हा शिक्षक तर नव्हतेच शिवाय प्राचार्यही जागेवर नव्हते.
६ ऑक्टोबर रोज झरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत गेले असता संस्थेमधील कर्मचारी नरांजे, सोमनकर, गोरे, पुसनाके या शिक्षकांनी कोणताही सुटीचा अर्ज न देता गैरहजर होते. तर गोहकार व नगराळे यांचे सुटीचे अर्ज कार्यालयात असून प्रभारी प्राचार्य नागोरे हे सुद्धा गैरहजर असल्याचे आढळले. ज्यामुळे अश्या बुट्ट्या मारणाऱ्या शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
आयटीआय येथे कायमस्वरूपी मुख्याध्यापकाची नेमणूक करून दोषी शिक्षकांवर कार्यवाही करा अशी तक्रार प्रहरचे तालुका अध्यक्ष आसिफ कुरेशी, सचीन कुमरे, रणधीर जुमनाके, विक्रम संभे,प्रशांत येटरे,महेश केराम ,सचिन पंधरे, मारोती गाउत्रे, चिंतामण किनाके, निकलेश पंधरे, विलास येरेवार, कुंदन कोडापे यानी केली आहे.