आज स. 11 वा. जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्थेचे उद्घाटन

12 वा. जत्रा मैदानावर उडणार शंकरपटाचा धुराळा, आज संध्याकाळी कीर्तन तर बुधवारी झाडीपट्टी रंगभूमिवरील सुपरहिट नाटक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रंगनाथ स्वामी अर्बन निधी अर्बन व लक्षीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या यशस्वी घोडदौडीनंतर आता जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोयायटी लि वणी ही पतसंस्था सुरू होत आहे. आज मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी टिळक चौक येथील पतसंस्थेच्या कार्यालयात स. 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते या पतसंस्थेचे उद्घाटन होत आहे. संजय खाडे हे या पतसंस्थेचे अध्यक्ष असून वणीतील ही पहिली मल्टीस्टेट पतसंस्था आहे. उद्घाटनानंतर 12 वाजता जत्रा मैदानावर शंकरपटाचे उद्घाटन होणार आहे. पुढील तीन दिवस हा शंकरपट रंगणार आहे. विशेष म्हणजे यात उद्घाटनपर जोडी एक जिगरबाज तरुणी हाकणार आहे.

शंकरपटासाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आले असून राज्यभरातील सुमारे 150 ते 200 बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर वणी विधानसभा क्षेत्रासाठी गावगाडा ही विशेष स्पर्धा राहणार आहेत. यात केवळ वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतक-यांना सहभागी होता येणार आहे.

शंकरपटानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
आज संध्याकाळी 7 वाजता जत्रा मैदानवरच जागतिक पातळीवरचे कीर्तनकार माधवराव धुमकेकर यांचा धमाल विनोदातून प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तर बुधवारी संध्याकाळी 6 वाजता झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाटक हंबरते गाय वासराची हे नाटक होणार आहे. एकता नाट्य कला मंच वडसा द्वारा हे नाटक सादर केले जाणार आहे.

वणी 26 वर्षांनंतर प्रथमच ही स्पर्धा रंगणार असल्याने वणी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा थरार अनुभवावा, असे आवाहन आयोजक संजय खाडे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती व संजय खाडे मित्रपरिवार परिश्रम घेत आहे.

Comments are closed.