शिवजयंती निमित्त आज सायंकाळी चार वाजता निघणार शोभायात्रा

जन्मोत्सवानिमित्त सकाळपासूनच विविध उपक्रमांचे आयोजन

 

बहुगुणी डेस्क, वणी: शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ द्वारा शिवजयंती उत्साहात साजरी झाली. याचाच भाग म्हणून आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक झाला. मुलामुलींनी लाठीकाठींची थरारक प्रात्यक्षिके प्रस्तुत केलीत. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बँडच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी श्रींच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याच उत्सवाचा भाग म्हणून सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा शहरातल्या विविध स्थानांवरून जाणार आहे व्यायामशाळेच्या लाट्याकठ्यांचे प्रदर्शन हे यावेळी मुख्य आकर्षण राहणार आहे. सुप्रसिद्ध कमांडो ट्रेनर ग्रँटमास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज हे वणीत भेट देणार असून ते 4 वाजता शिवरायांना अभिवादन करणार आहेत. 

यात मुलं आणि मुली लाठी काठीच्या खेळाचे प्रदर्शन करणार आहे अनेक विद्यार्थी छत्रपती शिवरायांची वेशभूषा साकारतील परिसरातील प्रसिद्ध भजन मंडळी या शोभायात्रेत राहतील छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांचे देखावे सर्वांना आकर्षित करणारे असे राहतील

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विदर्भातील प्रसिद्ध ढोल ताशा पथक आपले सादरीकरण करणार आहे या शोभयित्रीत बहुसंख्येने सहभागी होण्याची विनंती शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळाने केली आहे या आयोजनासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत

Comments are closed.