जगमोहन पोद्दार यांचे वृद्धापकाळाने निधन

शुक्रवारी स. 10 वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील रविनगर येथील रहिवासी असलेले जगमोहन पोद्दार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. आज गुरुवारी दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वणीतील सुप्रसिद्ध टूर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स एजन्सी अन्नपूर्णा ट्रॅव्हल्सचे ते संचालक होते. ही वणीतील पहिली टूर ऍन्ड ट्रॅव्हल्स एजन्सी मानली जाते. या एजन्सीद्वारे विविध धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांचे पर्यटन केले जायचे. मनमिळावू व मितभाषी स्वभाव अशी त्यांचे शहरात ओळख होती. गेल्या 7 ते 8 वर्षांआधी त्यांना पॅरालिसिस झाला होता. तेव्हापासून ते घरीच असायचे. त्यांच्या पश्चात मुलगा राजेंद्र पोद्दार, देवानंद पोद्दार, योगेश पोद्दार, एक मुलगी, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या रवि नगर येथील राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.   

Comments are closed.