जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुका अध्यक्षपदी संदिप बेसरकर तर सचिवपदी मोहम्मद मुष्ताक

पुरुषोत्तम नवघरे, वणी:  नुकतिच जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी संदीप बेसरकर तर मोहम्मद मुष्ताक यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवारी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे जागृत पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष राजू धवंजेवार यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली. सभेनंतर पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष संदिप बेसरकर, सचिव मो. मुस्ताक तर उपाध्यक्षपदी विवेक तोटेवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अशी आहे कार्यकारिणी…
अध्यक्ष संदीप बेसरकर, सचिव मोहम्मद मुस्ताक, उपाध्यक्ष विवेक तोटेवार, सहसचिव प्रशांत चंदनखेडे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम नवघरे,सद्स्य गणेश रांगणकर,श्रीकांत किटकुले, मनोज नवले, प्रवीण नैताम,आकाश दुबे, राहुल आहुजा तर कायदे विषयक सल्लागार ऍड.अमोल टोंगे राहतील.

Comments are closed.