जैन ले आऊट येथील चोरट्याचा चोरीचा डाव फसला

शेजाऱ्याची सतर्कता ठरली महत्वाची, व्हिडिओ झाला व्हायरल

0

विवेक तोटेवार, वणी: शहरात सोमवारी 14 सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा डाव शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे फसला. याबाबत घरमालक विठ्ठल दामाजी जुनगरी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. चोरटे हे सिसिटिव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.

Podar School 2025

विठ्ठल दामाजी जुनगरी यांचे जैन ले आऊट येथे घर आहे. ते भालर येथे वेकोलीत कर्मचारी असल्याने सध्या ते भालर टाऊनशिप येथेच आपल्या परिवारासह राहतात. त्यांचे वणीतील जैन ले आऊट येथील घर हे बंद आहे. याचाच फायदा उचलत सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरटे हे चोरीच्या उद्देशाने जुनगरी यांच्या घरी आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत असताना होणारा आवाज हा शेजारी राहणाऱ्या मोहितकर यांच्या कानी पडला. त्यांनी आरडाओरडा करताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. याबाबतची तक्रार विठ्ठल जुनगरी यांनी पोलिसात दिली असल्याची माहिती आहे. या चोरट्यांचे फोटो सिसिटिव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.

 

(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.