श्री जैताई देवस्थानात शनिदेव जयंती साजरी

0

गिरीश कुबडे, वणीः स्थानिक श्री जैताई देवस्थान येथे मंगळवारी शनिदेव जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी झाली. 1994 साली प्रा. बळीराम गणेश अणे यांनी या मूर्तीची स्थापना केली. दरवर्षी शनिजयंतीला इथे अभिषेक, पूजा व इतर विधी केले जातात. मंगळवारी सकाळी यानिमित्त अभिषेक झाला. श्री जैताई अन्नछत्र समितीच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

श्री जैताई अन्नछत्र समितीचे कार्यकर्ते

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या आयोजनाची माहिती प्रा. चंद्रकांत अणे यांनी ‘‘वणी बहुगुणी’’ला दिली. यावेळी समितीचे गुलाबराव खुसपुरे, समीर लाभशेटवार, प्रकाश परांडे, पाराशर, पानघाटे, फेरवानी, महाजन व इतर सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.