जैताई मंदिर नवरात्रासाठी सज्ज

किशोर गलांडे यांच्या कीर्तनाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्थानिक व परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले जैताई देवस्थान दि. ७ ते १५ आँक्टोबर पर्यंत संपन्न होणाऱ्या नवरात्रासाठी सज्ज झाले आहे. मंदिराच्या काही भागाचे नूतनीकरण करण्यात आले असून रंगरंगोटी करण्यात आली आहे. दि.७ला पहाटे ६ वाजता घटस्थापना होणार असून त्याच दिवशी भगवान शंकराच्या आकर्षक मूर्तीची स्थापना होणार आहे. मूर्ती वणीतील महाराष्ट्रख्यात शिल्पकार अशोक सोनकुसरे ह्याने तयार केली आहे.

या शिवाय रोज रात्री ७.३० ते ९.३० पर्यंत कीर्तन ,कथाकथन , भजन, देवीच जागरण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सकाळी ११ वाजता देणगीदारांच्या देणगीतून महाप्रसाद होईल. सायं.६.३० वाजता सामुहिक आरती होईल.

दि.१० व ११ आँक्टोबर रोजी किशोर गलांडे यांचे कीर्तन व कथाकथन आणि दि. १३ रोजी जैताई मंदिर व संस्कार भारती प्रस्तुत मासिक संगीत सभेचा देवी गीतांचा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांनी कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.