सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाचे प्रमाण अनियमित होत आहे. पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत न मुरता सरळ वाहून जात आहे. प्रत्येक नागरिकाने पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी काय करू शकतो याविषयीच्या मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील नगरवाचनालायत दि.19 मे ला सायंकाळी 5 वाजता आयोजित कार्यशाळेत अमरावती विभागीय जलनायक डॉ. नितीन खर्चे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेला उपस्थित राहून पाणी समस्येवर मार्ग काढण्यासाठी या कार्यशाळेत येण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे वणी तालुका संघचालक हरिहर भागवत यांनी केले आहे.