भर बाजारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

मुख्य आरोपी पोलिसांना पाहून पसार, तर 6 अटकेत

विवेक तोटेवार, वणी: वणीतील मुख्य बाजारात सुरू असलेल्या झंडीमुंडी जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. शनिवारी संध्याकाळी 6.40 वाजता ही धाड टाकण्यात आली. या धाडीत 6 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र मुख्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.

पोलिसांना वणीतील भाजी मार्केटच्या मागे झंडीमुंडी व मटका जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहिले असता तिथे काही जण प्लास्टिकच्या कापडावर कवडी टाकून पैशाच्या हरजितीचा जुगार म्हणजेच झंडीमुंडी खेळत होते. खात्री झाल्यावर पोलिसांनी धाड टाकून काहींना ताब्यात घेतले तर काही पळून जाण्यात यशस्वी झाले. 

घटनास्थळी पोलिसांचे पथक आल्याची चाहूल लागताच मुख्य आरोपी अब्दुल हाफिज उर्फ टापू अब्दुल सत्तार (35) रा. मोमीनपूरा हा पळून गेला. तर एजाज पीर खा पठाण (37) रा. रा शास्त्रीनगर, प्रमोद सागर देवगिरकर (37) रा. विराणी टॉकीज जवळ, सैय्यद जाफर सैय्यद ननु (31) रा. मोमीनपूर, गणेश शंकर भेंडाळे (30) रा. गणेशपूर, अशोक जनार्धन मामीडवार (68) रा. तलाव रॉड वणी, महेश रमेश झुरमोरे (60) रा. सुभाषचंद्र बोस चौक वणी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी पोलिसांनी जुगाराचे साहित्य व नगदी असा एकूण 5 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा 12 (अ), सहकलम 109 भादंवि नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.