जि. प. सेस फंडातून विविध साहित्यांचे वाटप

बचत गटांना कॅटरिंग व भजन मंडळाना दिले भजन साहित्य

1

जितेंद्र कोठारी, वणी: जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत सेस फंडातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित जि. प. सदस्य संघदीप भगत यांनी राजूर – चिखलगाव गणातील महिला बचत गटांना कॅटरिंग व भजन मंडळाला भजनाचे साहित्य आणि लाऊडस्पीकर साहित्याचे वाटप केले.

बाबाब जिल्हा परिषद समाज कल्याण 20% सामूहिक सेस फंडातून दरवर्षी विविध साहित्याचे वाटप करण्यात येत असते. यात श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ यांना लाडस्पीकर व भजन साहित्य वाटप करण्यात येतात. परंतु राजूर चिखलगाव गणाचे जि.प. सदस्य संघदीप भगत यांनी यावर्षी स्तुत्यपूर्ण नवीन उपक्रम राबवित

अनुसूचित जाती, अनुसूचित जातीजमाती व विमुक्त जाती व भटक्या जमातीतील महिला बचत गटांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी व त्यांना आर्थिक निर्भर होण्यासाठी जवळपास एक हजार नागरिकांचे जेवण बनविता येईल असे कॅटरिंग चे साहित्य वाटप करण्यात आले. उपक्रम अंतर्गत सावित्रीबाई फुले महिला बचत गट राजूर व सावित्रीबाई फुले महिला बचत गट पळसोनी यांना कॅटरिंगचे साहित्य ता. 3 जून रोजी वाटप करण्यात आले.

तर श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ चिखलगाव, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ मजरा, शहीद बिरसा मुंडा भजन मंडळ विरकुंड व वारकरी भजन मंडळ मूर्धोनी यांना भजन साहित्य तर विठ्ठल रूक्माई भजन मंडळ पळसोनी व श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ सोमनाळा यांना लाऊडस्पीकर साहित्य जि. प. सदस्य संघदीप भगत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

हेदेखील वाचा

आज वणी तालुक्यात 9 पॉजिटिव्ह

हेदेखील वाचा

धक्कादायक: जिवंत असलेला शेतकरी शासन दरबारी मयत

हेदेखील वाचा

”बाकी रंग गुलजार के संग” ऑनलाईन संगीत मैफल रविवारी

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.