”बाकी रंग गुलजार के संग” ऑनलाईन संगीत मैफल रविवारी

कलोतीनगर, अमरावती येथील सिंफनी ट्यून्स स्टुडिओचे आयोजन

0

बहुगुणी डेस्क, अमरावती: हिंदी सिनेसंगीत सृष्टीला पडलेलं सोनेरी स्वप्न म्हणजे गुलजार. जवळपास तीन पिढ्यांवर त्यांच्या गीतांची भुरळ आहे. गुलजार यांच्या निवडक गीतांची मैफल सिंफनी स्टुडिओने आयोजित केली आहे. ही ऑनलाईन मैफल रविवार दिनांक 6 जून रोजी रात्री 8 30 वाजता सिंफनी ट्यून्स या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह पाहता येईल.

या मैफलीत संजय व्यवहारे, डॉ. नयना दापूरकर, गुरुमूर्ती चावली, पल्लवी राऊत, अरविंद व्यास, सिरिषा चावली गायन करतील. संगीत संयोजन सुनित बोरकर यांचं आहे. पियानोची साथ सचिन गुडे यांची आहे. तबल्याची साथ विशाल पांडे करणार आहेत.

इंडिया वॉइस फेस्ट मध्ये दोन कॅटेगरीमध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, आणि रेक्स कर्मवीर ग्लोबल फैलोशिप आणि कर्मवीर चक्र अवार्डने सन्मानित तसेच जगविख्यात सुप्रसिद्ध अनाउंसर हरीश भिमानी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नासीर खान हे कार्यक्रमाचे निवेदन करतील हे विशेष.

True Care

याचं दर्जेदार चित्रिकरण अमिन गुडे यांनी केलं आहे. तांत्रिक बाजू भूषण बारबुद्धे सांभाळतील. जुना बायपास रोडवरील कलोतीनगरातील सिंफनी स्टुडिओत या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होणार आहे. नव्या कलावंतांनासुद्धा विविध उपक्रमांत नि:शुल्क संधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सिंफनीचे अध्यक्ष सचिन गुडे यांनी कळविले आहे.

हेदेखील वाचा

धक्कादायक: जिवंत असलेला शेतकरी शासन दरबारी मयत

हेदेखील वाचा

आज केवळ 1 पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांनी केली कोरोनावर मात

हेदेखील वाचा

आज वणी तालुक्यात 9 पॉजिटिव्ह

 

 

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!