पंचशील नगर प्रकरणात पीडित बहिणींना न्याय द्या

सामाजिक कार्यकर्त्यांचे एसडीओ व एसडीपीओंना निवेदन

0

जब्बार चीनी, वणी: पंचशील नगर येथील दोन तरुणींवर पोलिसांनी रेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप ठेवत रात्री घरून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांना शिविगाळ व मारहाण करून रात्री 12.30 वाजता घरी पाठवले, असा आरोप पीडित तरुणींनी केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडित मुलीला न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन वणीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिका-यांना दिले.

दिनांक 11 जुलै रोजी संध्याकाळी वणीतील शात्रीनगर इथून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्या तिन्ही मुलीला एक ड्रायवर असलेला तरुण पुण्याला नोकरी लावून देतो असे सांगून पुण्याला घेऊन जाणार होता. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून 5 हजार रुपये गाडीचे भाडे देखील घेतले होते. मात्र बाहेरगावी जाण्याची परवानगी न मिळाल्याने काही दिवस वणीत राहू व नंतर पुण्याला जाऊ. तो पर्यंत वणीतच कुठेतरी काही दिवस काढा असे सांगत तो तरुण त्या तिन्ही मुलींना घेऊन पंचशील नगर येथे पीडित तरुणीच्या घरी रूम भाड्याने करण्यासाठी आला होता.

प्रातिनिधिक फोटो

भाड्याने रूम ठरवून तो तरुण त्या घरून निघालेल्या तीन मुलींचे सामान व कागदपत्र आणण्यासाठी निघून गेला. मात्र दरम्यान त्या मुलींच्या पालकांना मुली बेपत्ता झाल्याचे कळले. त्यानी याबाबत पोलिसात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी ड्रायव्हर असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याला विचारले असता त्याने त्या मुली पंचशील नगरमध्ये असल्याचे सांगितले. त्यावरून रात्री 8 वाजताच्या दरम्याने पोलीस घर भाड्याने देणा-या पीडित तरुणीच्या घरी पोहोचले. तिथे त्यांनी त्यांच्यावर सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप करत त्या दोघा बहिणीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे त्यांना शिविगाळ व मारहाण केली. असा आरोप त्या पीडित दोन बहिणींनी केला.

दोनतीन तासांमध्ये प्रकरण मिटवण्यात आले. दरम्यान रात्री 12.30 वाजता पंचशील नगर येथील पीडित तरुणींना घरी जाण्यास सांगून घरी पाठवले, असा आरोप पीडित तरुणींनी केला आहे. याबाबत पीडित तरुणीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.

या प्रकऱणी सामाजिक कार्यकर्ते अनिल तेलंग यांच्यासह परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी एसडीओंना व एसडीपीओ यांना निवेदन दिले आहे. निवेदनात या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. छळ करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करावी, सखोल चौकशीसाठी एका अधिका-याची नियुक्ती करावी, तसेच छळ करणा-या कर्मचा-यांविरोधात ऍट्रोसिटी लावावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर अऩिल तेलंग, कृपाशिल तेलंग, गौरव जवादे, ऍड रुपेश ठाकरे, संदीप गोहोकर, दिलीप भोयर, प्रलय तेलतुंबडे यांच्यासह पीडित तरुणींच्या सही आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.