सावधान …! R O च्या पाण्यामुळे वाढतोय आरोग्यास धोका

राष्ट्रीय हरित लवादाचा शासनाला अल्टीमेटम

0

जितेंद्र कोठारी, वणी: मागील काही वर्षांपासून आपल्या समाजात शुद्ध पाण्याला व्यावसायिक रूप आले आहे. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान वापरून घरगुती व औद्योगिक RO फिल्टर प्लांट निर्मित करणाऱ्या शेकडो कंपन्यांनी आपल्या उत्पादनाला आरोग्याची जोड देऊन नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी RO प्युरीफायरने शुद्द केलेले पाण्याचे सतत वापरामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय हरित लवादा (NGT) यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला शेवटचा अल्टीमेटम देऊन डिसें. 2020 पर्यंत अशा RO प्लांटवर बंदीची मागणी केली आहे, जे पाणी शुद्ध करताना 80 टक्के पाणी वाया घालवतात.

RO म्हणजे रिवर्स ऑस्मोसिस प्रणालीला पाणी शुद्ध करण्याची सर्वात विश्वासाहार्य पद्धत मानली जाते. असे मानले जाते की आरओ पाण्यातील सर्व हानिकारक अशुद्धीला दूर करतो आणि ते पाणी पिण्यालायक होते. मागील काही काळापासून पाण्याचा अशुद्धीमुळे आणि आजरपणामुळे लोकांनी या पाणी स्वच्छ करण्याच्या तंत्रज्ञानाला स्वीकारले आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते आरओ दोन कारणांमुळे आरोग्यास अपायकारक आहे. पहिले तर पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत पाण्यातील सर्व खनिजे त्यातून काढली जातात, आणि दुसरे कारण पीएच स्थराला देखील कमी केले जाते.

जेव्हा पाणी एक सेमी पर्मिबल आरओ मेम्ब्रेनच्या माध्यमातून पारित होतो तेव्हा अनेक कार्बनिक आणि अकार्बनिक घटक त्यातून जाण्यास अपयशी ठरतात. कार्बन डायऑक्साइट सारखे गॅस आरओ मेम्ब्रेनमधून जातो. हा गॅस पाण्यात हायड्रॉक्साइन आयनो मध्ये अम्लीय हायड्रोजन कार्बोनेट या बायकार्बोनेट आयन बनवतो, तर हायड्रोजन आयन (H +) कोणत्याही पदार्थ शोधण्यास अपयशी होतो, कारण अधिकांश अशुद्धींना आरओ मेम्ब्रेनच्या माध्यमातून हटवण्यात येते. परिणामी पाण्यात H+ आयन चा एक सकारात्मक संतुलन होते, याचा पीएच कमी होतो आणि याला अम्लीय बनवण्यात येते. तुमच्या पाण्यात CO2 चे प्रमाण जितके अधिक असेल तितका तुमचा पीएच स्तर कमी असतो.


जल तज्ज्ञांच्या मते ज्या पाणी स्रोत मध्ये टीडीएसचे प्रमाण एक लिटर पाण्यात 500 मिलिग्राम पेक्षा कमी असेल ते पाणी शुद्द न करता पिण्यासाठी योग्य आहे. पाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीराला पोटेशियम, कैल्शियम आणि आयरन सारखे मिनरल्स मिळतात. परंतु RO मध्ये पाणी शुद्दीकरण प्रक्रियेत हे आवश्यक खनिजसुद्दा बाहेर फेकल्या जाते. त्यामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारची व्याधी उत्पन्न होतात.

आरओ आरोग्यासाठी घातक – WHO
जागतिक आरोग्य संघटनांच्या संशोधनात कळाले की कॅल्शियम किंवा मॅग्निशियम कमी असलेले पाणी पिल्यामुळे परिणाम म्हणून आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे कार्डिओ वॅस्कुलर डिजीजचा धोका संभवतो. संशोधनात हे देखील सांगण्यात आले की मॅग्निनिशयम कमी असलेले पाणी पिल्याने मोटर न्युरोनल डिजीज, गर्भवस्थाचे विकार, लहान मुलांचा अचानक मृत्यू आणि काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका उद्भवतो असे डब्यूएचओचे म्हणणे आहे.

जल है तो कल है…
संशोधकाच्या निष्कर्षानुसार पुढील विश्वयुद्द पाण्यासाठी होईल. मात्र सद्यपरिस्थित बाजार उपलब्ध आणि वापरण्यात येत असलेले पाणी शुद्दीकरण प्लांट व आरओ प्युरीफायरमधून 75 टक्के पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय व पर्यावरणाचा ह्रास होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.