वणी (रवि ढुमणे): वणी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या कळमना येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या पित्याने पोलिसात दिली होती. त्यावरून तपास करीत वणी पोलिसांनी हैदराबाद जवळील पच्चूर येथून ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील कळमना येथील एसपीएम शाळेत शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला 27 डिसेंबर ला रात्री दहा वाजताचे सुमारास गावातील युवकाने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या पित्याने पोलिसात दिली होती. यावरून ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक अशोक काकडे यांना तपासकामी लावले होते. गावातील नरेंद्र मारोती मेश्राम 23 याने मित्राच्या साथीने सदर अल्पवयीन मुलीला राळेगाव तालुक्यातील खेमकुंड येथे नेले. तेथून नातेवाईकांच्या सहकार्याने पांढरकवडा गाठले व हैद्राबाद येथे राहणाऱ्या मित्राला फोन करून ते गुंटूर कडे रवाना झाले.
पोलीस मागावर असल्याची माहिती त्याला मित्राकडून मिळत होती. त्यावरून नरेंद्रने मित्राच्या साहाय्याने सदर अल्पवयीन मुलीला गुंटूर पासून 44 किमी अंतरावर असलेल्या पचुर येथील जिनिंग मध्ये कामाला लावले. वणी पोलीस त्यांच्या मागावर होती. यातील एका मित्राला पोलिसांनी विश्वासात घेऊन हैदराबादच्या दिशेने रवाना झाले.
गुंटूर येथे गेल्यावर सोबत असलेल्या मुलाने नरेंद्रच्या मोबाईलवर फोन केला. याची भनक लागताच त्याने नरेंद्रला कामावरून हाकलून दिले. नरेंद्रच्या मागावर असलेले वणी पोलीस पचुर ला दाखल झाले मात्र नरेंद्र तेथे नव्हता त्याचा शोध घेत पोलिसांनी बस स्थानक गाठले आणि नरेंद्रला तेथेच पकडले.
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविणे सोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करणे यावरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. परराज्यात अल्पवयीन मुलीला नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करणे यासंबंधी भादंवी कलम 376 न नुसार गुन्हा नोंद होऊ शकतो. तूर्तास सदर अल्पवयीन मुलगी व तिला नेणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत.