यशस्वी: कमलाकर बडवाईक याना प्रतिष्ठित MDRT बहुमान

भारतीय जीवन विमा निगम वणी शाखेतर्फे सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय जीवन विमा निगम (LIC), वणी शाखेचे विमा अभिकर्ता कमलाकर बडवाईक (0056699K) यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा MDRT हा बहुमान मिळाला आहे. भारतीय जीवन विमा निगमच्या वणी शाखेत वाणीज्यक वर्ष 2022 मध्ये प्रथम MDRT होण्याचा बहुमानही त्यांनी प्राप्त केला आहे.

आवश्यक व्यवसाय केलेल्या विमा अभिकर्त्याला MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) चा बहुमान मिळतो. या राउंड टेबल कॉन्फरंससाठी जगभरातील विमा एजेंट्स सहभागी होतात. जगातील विविध देशातील मोठ्या शहरात हे सेमिनार होतात. या जागतिक संमेलनात सहभागी होण्याची संधी कमलाकर बडवाईक यांना मिळाली आहे.

MDRT हा बहुमान मिळण्यासाठी अभिकर्ता याना वर्षभरासाठी व्यवसायाचे टारगेट दिले जाते. कोरोना काळात व्यवसाय व सामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कळीत असताना कमलाकर बडवाईक यांनी कौशल्याने 75 दिवसांमध्ये हे टारगेट पूर्ण केले. विशेष म्हणजे विमा अभिकर्ता कमलाकर बडवाईक 2009 पासून एलआयसीचे CM क्लब मेम्बर आहे.

त्यांच्या या कार्याबद्दल अमरावती विभागाचे SDM यु.सी. मलिक, मॅनेजर (सेल्स) धोंगडे, वणी शाखाधिकारी प्रकाश झलके, अति. शाखाधिकारी योगेश रणदिवे आदींनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.