केशव नागरी पतसंस्था मुख्यालय ‘केशव स्मृती’ चे बुधवारी थाटात लोकार्पण 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन.... सोने तारण कर्ज, वेअरहाऊस कर्ज व लॉकर सुविधा उपलब्ध 

 

जितेंद्र कोठारी, वणी : येथील प्रतिष्ठित केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन आणि सुसज्ज मुख्यालयाचा भव्य लोकार्पण सोहळा बुधवार 27 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. जुने श्रीकृष्ण भवन, यवतमाळ अर्बन बँकेच्या मागे असलेली मुख्यालय इमारत ‘केशव स्मृती’ चे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. 

वणी येथील केशव नागरी सहकारी पतसंस्था हा सहकार क्षेत्रात एक प्रतिष्ठित संस्था आहे. 27 मार्च 1992 साली केशव नागरी या संस्थेचे बीज रोवल गेले. यवतमाळ जिल्ह्यात वणी, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा, यवतमाळ आणि उमरखेड या ठिकाणी संस्थेच्या शाखा कार्यरत आहे. प्रगतीकडे वाटचाल होत असताना कार्य विस्तार आणखी सुनियोजित पद्धतीने व्हावा, यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्व सोयीने सुसज्ज अशी केशव स्मृती या नावाने संस्थेची मुख्य कार्यालयाची इमारत बांधण्यात आली.

27 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता आयोजित या लोकार्पण सोहळ्यात मागासवर्गीय आयोगचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार मदन येरावार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रा.स्व.संघ तालुका प्रमुख बंडू भागवत, जिल्हा उप निबंधक, सह. संस्था यवतमाळ नानासाहेब चव्हाण, भारतीय जनता पक्ष जिल्हा प्रमुख तारेंद्र बोर्डे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

लोकार्पण सोहळ्याच्या मंगल प्रसंगी संस्थेच्या सभासदांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष चंद्रशेखर खोंड, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, मानद सचिव अनिल अक्केवार, संचालक प्रा डॉ. गजानन अघलते, सतीश कुल्दीवार, अनिल रईच, अनिल कावडकर, किशनलाल खुंगर, प्रदीप रासतवार, विलास लाखे, सुधीर डांगरे, कविता इंगोले, कल्पना गुंडावार व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दीकुंडवार यांनी केले आहे. 

Comments are closed.