वणीत बुधवारी युवा संमेलन… रंगणार व्याख्यान व व-हाडी काव्यमैफल

दु. 3.30 ते रा. 10 पर्यंत चालणार भरगच्च कार्यक्रम, लढा संघटनेचा उपक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त वणीत बुधवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी मंदिर येथे दुपारी 3.30 ते रात्री 10 पर्यंत हे युवा संमेलन चालणार आहे. या संमेलनात काव्य संमेलन, मिमिक्री, व्याख्यान अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध स्तंभलेखक व अभ्यासक प्रा. डॉ. संतोष डाखरे यांची या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहणार आहे. लढा संघटनेतर्फे या युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी 3.30 वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटनानंतर जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 4.30 वा. यवतमाळ यथील सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट आकाश महाडुळे यांचा आवाजांची कला हा कार्यक्रम सादर होणार आहे. संध्याकाळी 5 वा. प्रा. डॉ. संतोष डाखरे भामरागढ (गडचिरोली) यांचे विषय आजची राजकीय परिस्थिती व युवकांची भूमिका या विषयावर व्याख्यान होणार आहे. संध्याकाळी 5.30 वा. सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत, अकोला यांचा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार, विश्वास नांदेकर, संजय देरकर, प्रा. टिकाराम कोंगरे, अॅड. देविदास काळे, राजू उंबरकर, संजय खाडे, अशिष खुलसंगे, तारेंद्र बोर्ड, विनोद मोहितकर, प्रदीप बोनगिरवार, डॉ. महेंद्र लोढा, शंकर दानव, अनिल घाटे, इजहार शेख, संभाजी वाघमारे, डॉ. दिलीप मालेकर, वैभव ठाकरे, दिलीप भोयर, रज्जाक पठाण, नईम अजिज, सुधाकर चांदेकर, राहुल खारकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लढा संघटनेच्या प्रविण खानझोडे, विकेश पानघाटे, अजय धोबे, अॅड. रुपेश ठाकरे, ललीत लांजेवार, राहुल झट्टे, शरद खोंड, राजू पिंपळकर यांच्यासह लढा संघटनेच्या सर्व सदस्यांनी आवाहन केले आहे.

Comments are closed.