शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट

स्थानिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

0

मारेगाव: मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड दोन वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने, तालुक्यातील आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आरोग्य सेवेच्या समस्यांची कुणकुण स्वाभिमानी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना लागताच त्यांनी बुधवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्नालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी इथल्या समस्येचा आढावा घेतला. तसंच तिथल्या रुग्ण आणि उपस्थितांच्या समस्या जाणून घेतल्या.

किशोर तिवारी यांनी तीन महिन्यांपूर्वी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन इथल्या समस्या मिटवू असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांचं हे आश्वासन हवेतच विरलं. गेल्या तीन महिन्यात कोणत्याही आरोग्य सुधारणा झाली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये रोश वाढताना दिसत होता. त्यामुळे अखेर त्यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.

आरोग्य सेवेत सुधारणा व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कोणतेही प्रयत्न करत नसून, लोकांना आरोग्य सेवेपासून वंचित ठेवन्याचं श्रेय लोकप्रतिनिधीलाच जात असल्याचा भास तालुकावासियांना होत आहे. किशोर तिवारी यांनी तालुका आरोग्य सेवेकडे जातीने लक्ष देऊन आरोग्यसेवेचे प्रलंबित प्रश्न सोडवावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.