बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देणार

किशोर तिवारींचे झरी तालुक्यातील शेतक-यांना आश्वासन

0

रफीक कनोजे, मुकुटबन : सध्या विदर्भात कपाशी पिकांवर बोंडअळीच्या प्रार्दुभाव आला असून यामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक ५० टक्क्यावरून जास्त कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे . ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आला आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल व ज्या बियाणे कंपन्यांचे कापसाचे बियाणे खराब निघाले आहे, त्या सर्व कंपन्यांन्यावर सरकार नुकसान भरपाईचे दावे टाकणार असल्याची माहिती स्व. वसंतराव नाईक कृषी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. याबाबत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली रीतसर तक्रार द्यावी, तसंच कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

किशोर तिवारी यांनी कापसाच्या पिकांच्या व बियाण्यांच्या विषयी महाराष्ट्रात सक्त्तीचा कायदा असल्यामुळे एकही बियाणे कंपनी नुकसान भरपाई पासुन सुटणार नाही. मात्र गुलाबीअळीग्रस्त सर्व शेतकऱ्यांनी रितसर तक्रार करणे गरजेचे आहे. जर कृषी विभागाचे अधिकारी वा कर्मचारी तक्रार घेत नसतील माझ्याशी ९४२२१०८८४६ या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांचे यामुळे बरेच नुकसान होत आहे. त्यामुळे तिवारी यांनी तातडीने बैठक घेऊन बोंडअळीमुळे होत असलेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच शेतकरी फवारणी करताना विष बाधित झाले होते. अशा किटकनाशक औषधी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावे. ज्या किटकनाशकामुळे शेतकरी बाधित झाले. त्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांकडे किटकनाशक खरेदीचे देयक नसल्यास त्यांच्याकडून शपथपत्र घ्यावे, अशा सुचनाही यावेळी त्यांनी केल्या.

शेतकऱ्यांना पीककर्ज माफी देऊन नवीन पीककर्ज देणे आवश्यक आहे. पीककर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ मार्चपर्यंत जमा करण्यात येईल. विद्युत विभागाने शेतकऱ्यांचे प्रलंबित वीज देयक असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये, अशा सुचना विद्युत विभागाला केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.