वर्षातून केवळ एक दिवस घेण्याचे औषध, श्वसनाच्या आजारावर उपचार

नोंदणी सुरु... फक्त कोजागिरी पौर्णिमेला घेतले जाते 'हे' आयुर्वेदिक औषध

आयुर्वेद आणि कोजागिरी पौर्णिमा याचा जवळचा संबंध आहे. प्राचीन काळापासून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध उकळून पिण्याची प्रद्धत चालत आली आहे. चंद्रप्रकाशात उकळलेले हे दूध गुणकारी मानले जाते. आयुर्वेदात देखील काही रोगांवर उपचार म्हणून फक्त कोजागिरीच्या दिवशी काही उपचार केले जाते. यात दमा व श्वसनाच्या आजावरील औषधीचा समावेश आहे. वणीतील लोटी महाविद्यालय समोर असलेल्या डॉ. अभिषेक पटले यांच्या श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्रात कोजागिरी निमित्त औषधी दिली जाणार आहे. 4 ऑक्टोबरपासून औषधासाठी नोंदणी सुरु झाली आहे. यासह श्वसनाच्या विविध आजारावर व इतर आरोग्यविषयक समस्येवर 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान विशेष शिबिराचे आयोजिन केले गेले आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व औषधीसाठी नोंदणी करण्यासाठी 86685568787218501465 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

कसे व कुणी घ्यावे औषध?
नोंदणी केल्यानंतर सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी चिकित्सालयात स. 10 ते रात्री 8.30 पर्यंत औषध वितरण केले जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 1 ते 2 या दरम्यान दुधासोबत हे औषध घ्यावे लागते. दम लागणे, सतत सर्दी, कफ, नाक चोंदणे, वारंवार खोकला किंवा बरेच दिवस खोकला राहणे, श्वास घेण्यास त्रास होणे, शिंका येणे, ऍलर्जी, व्हायरल इन्फेक्शन, श्वासाच्या तक्रारी इत्यादी समस्या असणा-या व्यक्तींना हे औषध घेता येणार आहे. विशेष म्हणजे या औषधीचा कोणताही दुष्परिणाम नाही. त्यामुळे निरोगी व्यक्तींसाठी देखील हे औषध गुणकारी आहे.

पत्ता – श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
जगन्नाथ महाराज देवस्थानाच्या मागे, सपना कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट जवळ, ढुमे नगर, वणी
वेळ स. 10 ते 2 व संध्याकाळी 4 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत, मोबाईल नं. 8668556878 व 7218501465

कोजागिरी पौर्णिमा (ज्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात) आणि आयुर्वेद यांचा खूप खोल संबंध आहे. कोजागिरी पौर्णिमेला शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूची सुरूवात होते. या काळात निसर्गात बदल होतो. पावसाळ्यानंतर आकाश स्वच्छ असते, वातावरण थंड होऊ लागते. यावेळी शरीरात पित्तदोष वाढतो. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र सर्वाधिक जवळ असल्याने (perigee च्या आसपास) त्याच्या किरणांत औषधी गुणधर्म मानले जातात. म्हणूनच त्या रात्री दुध चंद्रप्रकाशात ठेऊन त्याचे सेवन केले जाते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीर निरोगी राहते आणि मन शांत होते, असे मानले जाते. त्यामुळे कोजागिरीनिमित्त उपचार करण्यासाठी एकदा संपर्क साधावा, असे आवाहन श्री विश्वसुवन आयुर्वेदिक चिकित्सालय द्वारा करण्यात आली आहे.

डॉ. अभिषेक पटले हे मुळचे वणीचे असून त्यांनी पुणे येथून आयुर्वेदाचार्य ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी पुणे येथे प्रॅक्टिस केल्यानंतर वणीत त्यांनी विविध आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरु केली आहे. त्यांची परिसरात आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ज्ञ म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे मारेगाव येथे दर शनिवारी आरोग्य सेवा दिली जाते.

(सदर लेख डॉ. अभिषेक पटले यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे.)

Comments are closed.