सुशील ओझा,झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोंसा येथील अमराई परिसरात कोंबडबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचला व 1 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता दरम्यान सुरू असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकली. धाड टाकताच बाजारातील काही शौकीन पसार झाले.
तर (ल) पांढरकवडा येथील कैलास मिलमिले व रुईकोट येथील बालाजी मोहितकर यांना पोलिसांनी पकडून अटक केली. त्यांच्या जवळील झुंज खेळविणारे दोन कोंबडे व लोखंडी कातीचे साहित्य असा एकूण 1700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही तरुणांवर कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अशोक नैताम, प्रवीण ताडकोकुलवार, नीरज पातूरकर, रमेश मस्के, स्वप्निल बेलखेडे व राम गडदे यांनी केली.
अडेगाव येथील तरुणास दारुसह अटक
मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत एकाही गावात अवैध धंदे सुरू नसून प्रत्येक गावातील धंद्याला ठाणेदार यांनी पूर्णपणे ब्रेक लावला आहे. परंतु अडेगाव येथील मंगेश मलवडे हा युवक लपूनछपून दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून बिट जमादार मोहन कुडमेथे व जितेश पानघाटे यांनी 2 नोव्हेंबर रोजी मंगेश मलवडे याला दारू विक्री करताना रंगेहात पकडले. त्याच्या जवळील 14 देशी दारूच्या बाटल्या किंमत 770 रुपये जप्त केली व मंगेश याच्यावर कार्यवाही करण्यात आली.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)