कोंबड बाजारावर पोलिसांची धाड, सात जुगाऱ्याना अटक

वणी पोलिसांची भालर रोडवर कारवाईत 1 लाख 35 हजाराचा मुदेमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी :  वणी भालर मार्गावर धोपटाळा तलावाच्या मागे झाडा झुडपात लपून छपून सुरु असलेल्या कोंबड बाजारावर वणी पोलिसांनी रविवार 3 एप्रिल रोजी धाड टाकून 7 जुगाऱ्याना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गोपनीय माहितीवरून सपोनि माया चाटसे यांनी पोलीस स्टाफसह रविवार 3 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता दरम्यान भालर मार्गावर धोपटाळा तलावाच्या मागे रेड केली. त्या ठिकाणी काही इसम कोंबडाच्या झुन्जीवर पैश्याची बाजी लावून हारजीतचा खेळ खेळताना आढळले. पोलीसांची धाड पडताच काही इसम त्याठिकाणहून फरार होण्यास यशस्वी झाले. तर 7 इसमाना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी दुचाकी, मोबाईल, रोख, व इतर साहित्यासह असे एकूण 1 लाख 34 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक करण्यात आलेले आरोपी संदीप वनकर (35) रा. गणेशपूर, स्वप्नील बरडे (33) रा. माजरी, मंगेश जुनगरी (38) रा. पेटूर, गणेश आवारी (24) रा. पिंपळगाव, उमेश जगझाप (25) रा. मोहुर्ली, प्रज्वल राउत (25) रा. जैन ले ऑउट व चरणदास लेनगुळे (44) रा. शिरपूर यांच्या विरुद्द कलम 12(अ), 12(क) महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे, ना.पो. दिगांबर किनाके, विठ्ठल बुरुजवाडे, सचिन मरकाम, संजय शेंद्रे, भानुदास हेपट, वासिम शेख, सागर सिडाम, गजानन गोडंबे यांनी पार पाडली. पुढील तपास पोना विठ्ठल बुरुजवाडे करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.